कलाकारांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ऑनलाईन शाॅर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. सिनेसृष्टीसोबत जोडलेले अनेक कलाकार यामध्ये सहभागी होऊ शकतात. यावेळी महोत्सवात शाॅर्टफिल्म दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय विजेत्या कलाकारांना बक्षिसेही दिले जाणार आहेत.
सोशल मीडियाच्या जमान्यात शाॅर्टफिल्मचे महत्त्वही खूप वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अक्षर मानव शाॅर्ट फिल्म ओटीटी शाॅफीच्या वतीने व्हिवर्स आधारित ऑनलाईन शाॅर्टफिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. अक्षर मानव ग्रुपच्या वतीने शाॅर्टफिल्म बनवणाऱ्या निर्माता-दिग्दर्शकांना यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी व्हायच असेल तर लगेच अर्ज करा. अर्ज करण्याठी स्पर्धेचा कालावधी हा फक्त 90 दिवसांचा आहे. नोंदणी केल्यापासून 90 दिवसांच्या आत आपली शाॅर्टफिल्म ओटीटी प्लॅटफाॅर्म शाॅफी वर पाठवायची आहे. स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाला 500 रुपये प्रवेश शुल्क असून भरावे लागणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला 11 हजार 111 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर द्वितीय विजेत्यास 7 हजार 777 रुपये आणि तृतीय विजेत्यास 5 हजार 555 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. इकच नाही तर चौथ्या विजेत्यास 3 हजार 333 रुपये, तर पाचव्या विजेत्यास 5 हजार रुपेयांच स्पेशल बक्षीस दिले जाईल.
शाॅर्टफिल्म स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुकांनी समर्थ सोनवणे (मो. 8261096865). यांच्याशी संपर्क साधावा. शाॅर्ट फिल्मला भाषेचे कोणतेही बंधन नाही. तुम्हाला कोणत्याही भाषेत शाॅर्टफिल्म बनवण्याची परमीशन आहे. शाॅर्टफिल्म बनवू इच्छिणाऱ्या निर्माता-दिग्दर्दशकांनी जास्तीत जास्त संख्येन सहभागी व्हावे. तसेच आपल्या प्रतिभेला फिल्मी दुनियेत नव्या उंचीवर नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन अक्षर मानव ग्रुपच्या वतीने सर्वांना करण्यात आले आहे. (Akshar Manav Short Film OTT Shafi has organized a viewers based online short film festival.)
अधिक वाचा-
–दिल्लीच्या मनजोतने मायानगरीत जाऊन कमावलं नाव, अजूनही ‘ही’ इच्छा आहे अपूर्ण
–पंधरा वर्षाची असताना ‘या’ प्रसिद्ध गायकाने श्वेता पंडितवर केले होते लैंगिक अत्याचार? वाचा ‘ती’ घटना