छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो असलेल्या ‘बिग बॉस मराठी’मधून मोठी बातमी समोर आली आहे. बिग बॉस मराठीचे यंदाचे पर्व चांगलेच रंगतदार झाले होते. अखेर या पर्वाला विजेता मिळाला आहे. अक्षय केळकर हा ‘बिग बॉस मराठी 4’चा विजेता ठरला आहे. सर्व स्पर्धकांना मागे टाकत अक्षय केळकर बिग बॉस बनला आहे. आज (रविवार, 8 जानेवारी) संध्याकाळी 7 वाजल्यापासून बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली होती. अंतिम टप्प्यात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने हे तिघेजण टॉप 3 स्पर्धक राहिले होते. त्यानंतर किरण माने हे घराबाहेर पडले. अखेरीस अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर या दोघांमध्ये अक्षय केळकर हा चौथ्या पर्वाचा विजेता ठरला.
View this post on Instagram
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फरहान अख्तरच्या आधी ‘या’ कलाकारांनाही घटस्फोटानंतर मिळाले खरे प्रेम, ‘या’ अभिनेत्याने केली आहेत तीन लग्न
‘मिल्खा सिंग’ची भूमिका साकारून बनला टॉप क्लास अभिनेता, वाचा अष्टपैलू कलाकार फरहान अख्तरबद्दल