Sunday, April 14, 2024

सलमान, शाहरुख की अक्षय कोण आहे सर्वात महागडा अभिनेता? एका चित्रपटासाठी घेतात ‘एवढी’ फी

बॉलिवूड इंडस्ट्री ही सर्वात महागडी फिल्म इंडस्ट्री मानली जाते आणि याचे कारण म्हणजे कलाकारांची फी आणि त्यांच्या चित्रपटांचे बजेट. सलमान, शाहरुख, अक्षयपासून ते आमिर खानपर्यंतची फी इतकी जास्त असते की कधी कधी या कलाकारांची फी चित्रपटाच्या बजेटपेक्षाही जास्त असते. आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांबद्दल सांगतो, जे एका चित्रपटासाठी भरमसाठ फी घेतात.

यादीतील पहिले नाव तसे सगळ्यांच्या ओठांवर कायम असते. ज्याने बॉलिवूडमधील अनेक ऍक्शन चित्रपटात काम केले आहे. तो म्हणजे अक्षय कुमार. (akshay kumar) अक्षय हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे ज्याचे दरवर्षी ४-५ चित्रपट प्रदर्शित होतात. त्याचे चित्रपट त्यांच्या चाहत्यांना देखील मोठ्या प्रमाणात आवडतात. माध्यमातील वृत्तानुसार तो प्रत्येक चित्रपटासाठी ११७ ते १३५ कोटी रुपये घेतो.

बॉलिवूडचा हँडसम हंक अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे सगळ्यांचा आवडता अभिनेता ऋतिक रोशन. (hrithik roshan) ऋतिकने अनेक चित्रपटात काम करून नाव कमावले आहे. तसेच त्याचा डान्स देखील अनेकांना आवडतो. सध्या तो एका चित्रपटासाठी ७५ कोटी रुपये मानधन घेत आहे.

अनेक रोमँटिक चित्रपटात काम करून तरुणांना प्रेमाचे धडे देणारा शाहरुख खान (shahrukh khan) आज एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने त्यांच्या या करीरारमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका असणारे चित्रपट केले आहेत. माध्यमातील वृत्तानुसार शाहरुखला त्याच्या आगामी ‘पठान’ चित्रपटासाठी १०० कोटी रुपये फी देण्यात आली आहे.

अभिनेता आमिर खान (aamir khan) हा वर्षात एकच चित्रपट काढतो. परंतु तो असा असतो की, तो चित्रपट मोठमोठ्या चित्रपटांना टक्कर देतो. आमिर खान लवकरच लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या फीबद्दल माध्यमातील वृत्तानुसार तो एका चित्रपटासाठी ७५-८० कोटी रुपये घेतो. सलमानच्या (salman khan) फीबद्दल बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो एका चित्रपटासाठी ७० -७५ कोटी रुपये घेतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा