Thursday, June 1, 2023

‘मन्नत’चा खरा बॉस नाहीये शाहरुख खान! अभिनेत्याने सांगितल्या बंगल्याशी संबंधित अनेक रंजक गोष्टी

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण कोणत्या ना कोणत्या कारणाने तो नेहमीच चर्चेत असतो. नुकताच शाहरुख दिल्लीत आला होता. येथे एका कार्यक्रमादरम्यान त्याने अशा काही गोष्टी सांगितल्या, ज्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली. खरं तर, शाहरुख एका इलेक्ट्रॉनिक ब्रँडच्या कार्यक्रमाला पोहोचला होता. जिथे त्याने पत्नी आणि घर मन्नतबद्दल अनेक गुपिते उघडली. पत्नीचे कौतुक करताना शाहरुखने सांगितले की, त्याची पत्नी गौरी घराची बॉस आहे आणि घरात तिचंच चालतं.

मन्नतची बॉस आहे गौरी खान 
मुलाखतीदरम्यान किंग खानने सांगितले की, त्याच्या घराची लेडी बॉस त्याची पत्नी आहे. तिच्या परवानगीशिवाय घरात काहीही बदलता येत नाही. अगदी शाहरुखलाही घरातील वस्तू बदलण्याची परवानगी नाही. गौरीचे कौतुक करताना तो म्हणाला की, ती एक अद्भुत इंटिरियर डिझायनर आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्याच्या सजावटीवर तिने अतिशय बारकाईने काम केले आहे. (Some interesting facts about shahrukh khan’s mannat house)

मन्नतमध्ये आहेत ‘इतके’ टीव्ही
मीडियाशी बोलताना शाहरुखने मन्नतशी संबंधित आणखी काही रंजक गोष्टी सांगितल्या. त्याने सांगितले की, त्याच्या घरात अनेक टीव्ही आहेत. ज्याची किंमत ३०-४० लाख रुपये आहे. त्याने सांगितले की, त्याच्या बेडरूममध्ये एक टीव्ही आहे. याशिवाय अबराम, आर्यन आणि सुहानाच्या रुममध्येही एक-एक टीव्ही लावण्यात आला आहे. अभिनेत्याचा अंदाज आहे की, त्याच्या घरात एकूण ११-१२ टीव्ही आहेत.

शाहरुखचा मन्नत हा बंगला त्याच्या शानदार इंटिरियर डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे. लोक अनेकदा इंटरनेटवर या बंगल्याचे फोटो शोधतात. मुंबईत येणारे लोक शाहरुख खानचा बंगला बघायला नक्कीच जातात. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर शाहरुख लवकरच ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. पुढील वर्षी जानेवारीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा