सध्या अनेक लहान- मोठे म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित होत आहेत. अशा म्युझिक व्हिडिओमध्ये बरेच मोठे कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. याला अक्षय कुमार देखील अपवाद नाही. फिटनेस फीक्र असणारा अक्षय त्याच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करतो. मात्र, अनेक म्युझिक व्हिडिओंमधून देखील त्याने रसिकांना वेड लावले आहे. २०१९ साली अक्षयचा ‘फिलहाल’ नावाचा एक अल्बम प्रदर्शित झाला होता. या व्हिडिओला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. नुपूर सेननसोबत या गाण्यातली त्याची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. या गाण्याच्या माध्यमातून क्रिती सेननची बहीण असलेल्या नुपूर सेननने अभिनयाची सुरुवात केली होती.
अक्षयने अनेक सुपरहिट पंजाबी गाणे फॅन्सला दिले आहेत. मागच्या काही काळापासून अक्षय आणि नुपूरच्या ‘फिलहाल २’ ची फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ होती, काही दिवसांपूर्वी या गाण्याचा एक छोटा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर तर रसिकांची ही उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र, अखेर हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातही प्रेमात होणारा त्रास दाखवण्यात आला आहे. वधूच्या वेशभूषेत असलेली नुपूर आणि तिच्या लग्नाच्या वरातीत ओक्साबोक्सी रडणारा आणि तरीही नाचणारा अक्षय कुमार भावुक करून जातो. दोन लोकं जरी एकमेकांवर प्रेम करत असले, तरीही ते सोबत राहतील असे नाही. सोबत न राहताही ते एकमेकांवर प्रेम करताना या गाण्यात दाखवले आहे. अक्षय नुपूरसोबत घालवलेले जुने प्रेमाचे दिवस आठवताना देखील दिसतो. गाण्याचा शेवटी तर काळीज चिरणारा दाखवला आहे.
पहिल्या गाण्याप्रमाणे हे गाणे देखील बी प्राकने गायले असून, या गाण्याचे शब्द जानीने लिहिले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन अरविंद खैरा यांनीच केले आहे. गाणे प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्याला आतापर्यंत १ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो ‘रक्षाबंधन’, ‘बच्चन पांडे’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘राम सेतू’ या सिनेमात दिसणार असून येत्या २७ जुलैला त्याचा बहुप्रतीक्षित ‘बेलबॉटम’ चित्रपट प्रदर्शित होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’, म्हणत पॅपराजींसमोर ‘बिंधास्त’ पोझ देणारी निया शर्मा नेटकऱ्यांकडून ट्रोल
नादच खुळा! अंकुश राजाचे नवीन गाणे रिलीझ होताच झाले व्हायरल; नीलम गिरीच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष