अक्षय आणि प्रियदर्शन यांची जोडी पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज, २०२२ मध्ये करणार कॉमेडी चित्रपटाची शूटिंग


बॉलिवूडमध्ये विनोदी चित्रपटासाठी प्रसिद्ध असणारे दिग्दर्शक म्हणजे प्रियदर्शन. त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये जवळपास 70 पेक्षाही जास्त चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी तेलुगू, तमिळ मल्याळम आणि हिंदी भाषेतील चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी नुकतीच अशी घोषणा केली आहे की, ते पुढच्या वर्षी अक्षय कुमारसोबत त्यांच्या पुढच्या विनोदी चित्रपटाची शूटिंग करणार आहेत. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्या जोडीने ‘हेरा फेरी’ सीरिज, ‘गरम मसाला’ आणि ‘भूल भुलैया’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले आहे. (Akshay Kumar and priydarshan will again work together in 2022)

प्रियदर्शन यांनी सांगितले की, ते या वर्षीच अक्षय कुमारसोबत चित्रपटाची शूटिंग सुरू करणार होते. परंतु कोरोना महामारीमुळे त्यांना हा प्रोजेक्ट पुढे ढकलावा लागला. त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, “आम्ही याच वर्षी शूटिंग सुरू करणार होतो. परंतु उशीर झाला आहे. हा पूर्णपणे एक विनोदी चित्रपट आहे आणि आता आम्ही या चित्रपटाची शूटिंग पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला करणार आहोत.”

प्रियदर्शन यांनी‌ शनिवारी (3 जुलै) अक्षय कुमारला ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. त्यावेळी त्यांनी फोटो शेअर करत सांगितले की, अक्षय कुमारसोबत आगामी प्रोजेक्टबाबत बोलण्यासाठी ते दोघे भेटले होते. त्यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. हा फोटो शेअर करून त्यांनी लिहिले की, “खूप मोठ्या ब्रेकनंतर आम्ही आगामी प्रोजेक्टबाबत चर्चा करत आहोत आणि ते अक्षय कुमारसोबत चर्चा करण्याचा आनंद घेत आहेत.”

प्रियदर्शन सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘हंगामा 2’ प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे. हा चित्रपट 24 जुलैला डिझनी प्लस हॉट स्टारवर प्रदर्शित होणार आहे. 2003 मध्ये त्यांचा ‘हंगामा’ हा चित्रपट आला होता. त्याच चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटात परेश रावल, शिल्पा शेट्टी, मीझान जाफरी आणि प्रणिता सुभाष यांच्या भूमिका आहेत.

अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो लवकरच आनंद रायच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात सारा अली खान आणि धनुषसोबत दिसणार आहे. यासोबतच तो जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचासोबत ‘राम सेतू’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.