Friday, June 20, 2025
Home बॉलीवूड ३० कोटी पेक्षाही जास्त फी घेणाऱ्या अक्षय कुमारची पहिली कमाई माहित आहे का? वाचा सविस्तर

३० कोटी पेक्षाही जास्त फी घेणाऱ्या अक्षय कुमारची पहिली कमाई माहित आहे का? वाचा सविस्तर

अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच चाहत्यांच्या गोडीला लागतो. त्याने आजवर खूप धमाल चित्रपट दिलेत. आज तो एका चित्रपटासाठी करोडोंमध्ये पैसे घेतो, पण त्याचा पहिला पगार किती होता हे ऐकल्यावर तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल!

अक्षय कुमार बॉलिवूडमधला एक खूप यशस्वी हिरो आहे. तो नेहमीच सिनेमांमधून दिसतो. दरवर्षी तो किमान चार चित्रपट घेऊन येतो, म्हणून तो नेहमी चर्चेत राहतो. त्याने खूप कष्ट घेऊन हे सगळं यश मिळवलंय. आज अक्षय एका चित्रपटासाठी करोडोंमध्ये पैसे घेतो, पण त्याचा पहिला पगार तर १०,००० रुपयांचाही नव्हता! ही गोष्ट खुद्द अक्षयनेच सांगितली आहे.

अक्षय कुमारने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत आपला पहिला पगार किती होता हे सांगितलं. तो म्हणाला, “माझा पहिला पे चेक फक्त 5001 रुपये होता.” हे ऐकून कोणीही हैराण होईल! त्याला विचारलं की हा पगार “सुगंध” या त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी होता का, तर तो हसून म्हणाला, “नाही रे, मला पहिला चेक ‘दीदार’ या चित्रपटासाठी मिळाला होता. प्रमोद चक्रवर्तीसरांनी मला ते 5001 रुपये दिले होते.”

अक्षय कुमारचा पहिला पगार फक्त 5001 रुपये होता, आणि आता तो एका चित्रपटासाठी थेट 90 कोटी रुपये घेतो! त्याच्या प्रवासात खूप मोठा बदल झालाय. अक्षय म्हणतो, “माझं यश हे फक्त मेहनतीमुळे नाही, तर नशिबामुळेही आहे. यात 70 टक्के नशिब आणि 30 टक्के मेहनत आहे.”

वर्क फ्रंट बद्दल बोलायचं झालं, तर अक्षय कुमारचा अलीकडेच हाउसफुल 5 हा चित्रपट रिलीज झाला आणि तो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आता तो लवकरच मोहनलाल आणि प्रभाससोबत कन्नप्पा या चित्रपटात दिसणार आहे, आणि हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

अक्षयने मागच्या काही वर्षांत एकापेक्षा एक धमाल चित्रपट दिले आहेत, हेरा फेरी, वेलकम, हाउसफुल, ओएमजी हे लोक आजही आवडीने पाहतात. सध्या तो हेरा फेरी 3 मुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून परेश रावल बाहेर पडल्यामुळे थोडासा गोंधळ निर्माण झालाय.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘रेडी’ चित्रपटात जेनेलियाला न घेतल्याबद्दल आली अभिनेत्रीची प्रतिक्रिया, ऐकून सलमान खान होईल खुश
ड्रेसवरून ट्रोल केल्याने झरीन खानवर ख़ुशी मुखर्जीने काढला राग; म्हणाली, ‘सलमानसोबत डेब्यू केला तरी…’

हे देखील वाचा