Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड जेव्हा सैफ-करीनाच्या अफेअरबद्दल अक्षय कुमारला मिळाली माहिती, थेट ‘हा’ सल्ला देऊन मोकळा झाला अभिनेता

जेव्हा सैफ-करीनाच्या अफेअरबद्दल अक्षय कुमारला मिळाली माहिती, थेट ‘हा’ सल्ला देऊन मोकळा झाला अभिनेता

सैफ अली खान (Saif Ali Khan) त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. अभिनेत्याचे पहिले लग्न १९९१ मध्ये अभिनेत्री अमृता सिंगसोबत (Amrita Singh) झाले होते. सैफ आणि अमृताने हे लग्न घरच्यांच्या इच्छेविरुद्ध केल्याचे बोलले जाते. त्याचवेळी सैफ वयातही अमृतापेक्षा १२ वर्षांनी लहान होता. या लग्नापासून अमृता आणि सैफला सारा अली खान (Sara Ali Khan) आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) ही दोन मुले झाली. मात्र, लग्नाच्या १३ वर्षांनंतर घटस्फोट घेतल्यानंतर सैफ आणि अमृता एकमेकांपासून वेगळे झाले. अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सैफने २०१२ मध्ये अभिनेत्री करीना कपूरसोबत (Kareena Kapoor) लग्न केले. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २००८ मध्ये आलेल्या ‘टशन’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सैफ आणि करीनामध्ये जवळीक वाढली होती. या चित्रपटात सैफ आणि करिनासोबत अक्षय कुमार (Akshay Kumar) देखील मुख्य भूमिकेत होता. बातम्यांनुसार, अक्षय कुमार हा पहिला अभिनेता होता ज्याला सैफ आणि करिनाच्या या जवळीकीची कल्पना आली होती. (akshay kumar gave this advice to saif ali khan)

सैफ आणि करीनाचे एकमेकांवर प्रेम असल्याचे समजल्यानंतर अक्षय कुमारने सैफला एक सल्ला दिला होता. सैफला एक मजेदार सल्ला देताना अक्षय म्हणाला, “बेबोला जपून वागव, ती इंडस्ट्रीतील डेंजर कुटुंबातील आहे.” मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफनेही अक्षय कुमारला सांगितले की, तो करीनाला नीट सांभाळेल.

दुसरीकडे, सैफ आणि करीना तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान या दोन मुलांचे पालक आहेत. सध्या हे जोडपं आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा