Wednesday, June 26, 2024

खिलाडी कुमार साकारतोय शिवाजी महाराजंची भूमिका, ‘या’ चित्रपटामधून मराठी इंडस्ट्रीत करणार पदार्पण

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमार याने अनेक गाजणाऱ्या चित्रपटाने चाहत्यांतचे मनं जिंकली आहेत. त्याने कॉमेडी असो किंवा थ्रिलर भूमिका असो त्याने प्रत्येक भूमिकेने चाहत्यांवर भुरळ घातली आहे. आता मात्र, अक्षय मराठी चित्रपटावर आपली छाप उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. म्हणजेच खिलाडी कुमार शिवाजी महाराजांची भूमिकेतून मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करतोय.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीला मानवंदना देत महेश मांजरेक (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात‘ या चित्रपटामधून बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे. यामध्ये तो शिवाजी माहाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगगला नुकतं सुरुवात झाली आहे.

बुधवारी (दि, 2 नोव्हेंबर) दिवशी महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचा शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चित्रपटाचा शुभारंभ करत प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यासोबतच नवनिर्माण सेनेचे आध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दजेखिल या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या चित्रपटाची निर्मिती वसिम कुरेशी (Vasim Qureshi) यांनी केली असून लेखन पराग कुलकर्णीने केले आहेत. संगित हितेश मोडक यांनी केले आणि नृत्याची जबाबदारी गणेश आचार्य (Ganesh Acharya) सांभाळणार आहे. लकरच चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीला उजाळा देणारा असून पुढच्या वर्षी दिवाळीमध्ये चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. आता यामध्ये अक्षय कुमारचा सहभाग देखिल होणार आहे. यापूर्वी अक्षयला आपइण सतत पोलिस, कॉमेडी आणि खिलाडी प्रकारच्या भूमिका साकारताना पाहिले आहे. मात्र, तो पहिल्यांदाच शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.

अक्षय कुमारला आपण बऱ्यावेळेस चांगली मराठी बोलताना पाहिले आहे, पण यावेळेस तेट शिवाजी महाराजाज्या भूमिकेत कशाप्रकारे तो बोलेल याची चाहत्यांना आतुरता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रणवीर सिंग आणि पत्नी दीपिकासोबत शेअर केलं व्हिडिओ, एकत्र बोट राईडचा घेतेय आनंद
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ…

हे देखील वाचा