Monday, June 17, 2024

मीच ‘बिग बॉस’चा ऍंकर होणार …’ अभिजित बिचुकलेने घेतला थेट महेश मांजरेकरांशी पंगा

‘बिग बॉस’ हा टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळतो. त्यामुळेच चाहते प्रत्येक सिझनंतर चाहते पुढच्या सिझनची वाट पाहत असताना दिसतात. आता लवकरच मराठी बिग बॉसचे चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याची सर्वांनाच जोरदार उत्सुकता लागली आहे. मराठी बिग बॉसचे आधीचे तिनही सिझन तुफान लोकप्रिय ठरले होते. त्यामुळे या पर्वात कोणाकोणाची एंट्री होणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. त्याआधी बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकर आणि अभिजित बिचुकले यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला आहे.

बिग बॉसच्या मागच्या पर्वात अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) हे सर्वात वादग्रस्त आणि चर्चित स्पर्धक ठरला होता. या कार्यक्रमात अभिजीत बिचुकलेंच्या करामती चांगल्याच गाजल्या होत्या. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. काही दिवसांपुर्वीच महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी बिग बॉस लॉंचिंग इव्हेंट घेतला होता. यावेळी त्यांना मागच्या पर्वातील कोणत्या स्पर्धकाला पुन्हा पाहायला आवडेल असा प्रश्न विचारला होता. यावेळी त्यांनी अभिजित बिचुकलेला पाहायला आवडणार नाही कारण तो खेळात सहभागी होत नव्हता अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यांची ही प्रतिक्रिया बिचुकलेला मात्र चांगलीच झोंबली असून त्यावर त्याने सडेतोड उत्तर दिले आहे.

महेश मांजरेकर यांच्या या टिकेला उत्तर देताना बिचुकले म्हणाला की, “महेश मांजरेकर त्यांच्या विधानाला किती महत्व द्यायचं. ते तिथे पैसे देवून नोकरी करतात. सेकंड सीझन कोणामुळे गाजला, मी किती टीआरपी दिला? याची कंपनीला जाण असेल त्यामुळे ते मांजरेकरांच्या विधानाला फारसे महत्व देणार नाहीत.” इतकेच नव्हेतर भविष्यात मी बिग बॉसचा ऍंकर होईन असा मला विश्वास आहे. असेही तो यावेळी म्हणाला. दरम्यान मराठी बिग बॉस प्रमाणेच अभिजीत बिचुकलेने हिंदी बिग बॉसमध्येही चांगलाच धुमाकूळ घातला होता. यामध्ये त्याने थेट सलमान खानशी पंगा घेतला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- ‘ही तर सुवर्णसंधी…’, मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबद्दल केला मोठा खुलासा
जेव्हा दिग्दर्शकाने 16 वर्षांच्या जन्नतपुढे केलेली ‘ही’ गजब मागणी, झाला होता भलताच मोठा वाद
पोषाखकलेत उत्तुंग भरारी! रियॅलिटी शोचा फॅशन डिझायनर म्हणून संदेश नवलखाच्या नावाचा डंका

हे देखील वाचा