Monday, September 25, 2023

आपल्याच सिनेमाला अक्षय कुमार म्हणाला होता ‘बकवास’, पण बॉक्स ऑफिसवर केलेली बजेटच्या तिप्पट कमाई

बॉलिवूडमध्ये असे काही सिनेमे आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर राज्य केले आहेच, पण प्रेक्षकांचे हृदय जिंकण्याची संधीही त्यांनी सोडली नाही. यापैकीच एक सिनेमा म्हणजे ‘फिर हेरा फेरी‘ होय. या सिनेमातील ‘बाबू राव’, ‘श्याम’ आणि ‘राजू’ हे पात्र प्रेक्षक कदाचित कधीच विसरू शकत नाहीत. या सिनेमांमधील डायलॉग्जचे आजही सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत असतात. या ब्लॉकबस्टर सिनेमाला अक्षय कुमार याने बकवास म्हटले होते. मात्र, सिनेमाने धमाल केली होती. चला तर सिनेमाविषयीचे खास किस्से जाणून घेऊया…

‘फिर हेरा फेरी’ (Phir Hera Pheri) हा सिनेमा सन 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा सन 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेरा फेरी’ या सिनेमाचा दुसरा भाग होता. निर्माते फिरोज नाडियाडवाला यांना वाटत होते की, ‘फिर हेरा फेरी’ या सिनेमाचे दिग्दर्शनही प्रियदर्शन यांनीच केले पाहिजे. मात्र, त्यांना नकार देत प्रियदर्शन म्हणाले की, “चमत्कार फक्त एकदाच होऊ शकतो.”

‘या’ दिग्दर्शकाने बनवला सिनेमा
प्रियदर्शन यांनी दिग्दर्शन करण्यास नकार दिल्यानंतर निर्मात्यांनी नीरज वोहरा यांना सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिली. योगायोग म्हणजे, प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘चुप चुप के’ आणि ‘फिर हेरा फेरी’ हे सिनेमे रुपेरी पडद्यावर एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. ‘चुप चुप के’ हा सिनेमा रुपेरी पडद्यावर खास कमाल दाखवू शकला नाही. मात्र, ‘फिर हेरा फेरी’ सिनेमाने बक्कळ पैसा कमावला होता. 18 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘फिर हेरा फेरी’ सिनेमाने तब्बल 69 कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘हेरा फेरी’ची जोडी पुन्हा एकदा आली एकत्र
‘फिर हेरा फेरी’ या सिनेमात परेश रावल (Paresh Rawal), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांची जोडी पाहायला मिळाली होती. मात्र, या सिनेमातील अभिनेत्री बदलल्या होत्या. मुख्य भूमिकेत तब्बूच्या जागी बिपाशा बासू आणि रिमी सेन यांना कास्ट करण्यात आले होते.

सुनील शेट्टी होता नाराज?
असे म्हटले जाते की, अभिनेता सुनील शेट्टी हा त्याच्या रोलमुळे खूपच नाराज होता. त्याला वाटत होते की, सिनेमात त्याचा रोल छोटा करण्यात आला आहे. त्यावेळी असे वृत्त आले होते की, अक्षय सिनेमातील स्वत:चा रोल वाढवण्यासाठी सहकलाकाराचा रोल कमी करतो. अक्षयने या बातम्यांवर पूर्णविराम लावत सांगितले होते की, निर्मात्यांनी ‘कितने अरमान’ या गाण्यात स्वत: माझे सीन कट करून अर्धे केले आहेत.

मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरला सिनेमा
मुलाखतीदरम्यान अक्षयने आपल्याच सिनेमावर निशाणा साधला होता. तो म्हणाला होता की, “बकवास आहे, पण सुपरहिट आहे.” याव्यतिरिक्त कास्टिंगबद्दल बोलायचं झालं, तर ‘फिर हेरा फेरी’ सिनेमात सुनील शेट्टी आणि बिपाशा बासू यांची जोडी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
शुबमन गिलच्या मित्राने फोडलं भांडं! वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना घेतलं ‘सारा’चं नाव; पण चाहते गोंधळात
विमानतळावर अचानक धावायला लागली अभिनेत्री काजोल, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘द कपिल शर्मा शो’चा प्रोमो शूट केल्यानंतर चंदन प्रभाकरने साेडला शो, कृष्‍णा अभ‍िषेक देखील दिला डच्चू

हे देखील वाचा