Wednesday, December 6, 2023

‘जेव्हा पाऊस येतो…’ कामाच्या गराड्यात देखील अक्षय कुमारला सतावतीये पत्नीची आठवण

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar)सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे वेग वेगळे फोटो आणि व्हिडीओ तो नेहमीच त्याच्या चाहत्यांसाठी शेअर करत असतो. अशातच अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोद्वारे त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले आहे की तो त्याची पत्नी ट्विंकल खन्नाला (twinkle khann) भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. अक्षयच्या चाहत्यांना त्याचा हा फोटो खूप आवडला असून पोस्टवर कमेंट करून चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अक्षयची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. त्याच्या पोस्टवर २४ तासांत ४ लाखांहून अधिक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर आपला नवीन फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “पाऊस सुरू झाला की शूट रद्द होते, त्यामुळे कुटुंब इथे येते. #YorkToLondon.” अक्षयची पोस्ट पाहून असे वाटते की त्याच्या चित्रपटाचे शूटिंग रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे त्याला या संधीचा फायदा घेऊन आपल्या कुटुंबासह आणि पत्नीसोबत आनंदाचा क्षण घालवायचा आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

ट्विंकल खन्ना सध्या यॉर्कमध्ये सुट्टीवर आहे. तत्पूर्वी, ट्विंकलने याबद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते, “माझ्या मागे जा आणि छोट्या यॉर्कमध्ये काहीतरी शोधूया? प्रत्येक कोपरा पाहण्यासाठी तुमचे पाय आवश्यक आहेत. तुम्ही कोणत्या छोट्या शहरांच्या प्रेमात पडला आहात आणि का?”

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते जोडपे आहेत. त्यांच्या लग्नाला दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आरव आणि मुलगी नितारा आहे. ट्विंकल ब-याच काळापासून बॉलिवूडपासून दूर असली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

देवा! हे काय बोलून बसला किच्चा सुदीप?, ‘सलमान आणि शाहरुखला घेऊन काम केल्यास येणार हार्ट अटॅक’

सस्पेन्स थ्रिलर बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे मोहित सुरी, आतापर्यंत ‘या’ सुपरहिट चित्रपटांचं केलंय दिग्दर्शन

पारस छाबराला डेट करायची मिका सिंगची होणारी पत्नी, जाणून घ्या कोण आहे आकांक्षा पुरी

हे देखील वाचा