Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड सुपरस्टार व्हायचंय? अक्षय कुमार ऑनलाईन देणार अभिनयाचे धडे; ‘खिलाडी’ने सुरू केला प्रोफेशनल मास्टर क्लास

सुपरस्टार व्हायचंय? अक्षय कुमार ऑनलाईन देणार अभिनयाचे धडे; ‘खिलाडी’ने सुरू केला प्रोफेशनल मास्टर क्लास

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमार हा त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. एका नंतर एक अक्षयचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यातच त्याचा बहुचर्चित ‘बेलबॉटम’ हा चित्रपट याच महिन्यात 27 जुलैला प्रदर्शित होणार आहे. यातच अक्षय त्याचा आणखी एक नवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांसमोर उभाच आहे. हा प्रोजेक्ट त्या लोकांसाठी खूप फायद्याचा असणार आहे, ज्यांना अभिनयामध्ये त्यांचे करिअर करायचे आहे.

अक्षय कुमार आता लोकांना ऑनलाईन अभिनय शिकवणार आहे. अक्षयने काही वेळापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले की, “जेव्हा मी अभिनेता बनण्याचा सराव करत होतो, तेव्हा मला अधिकृतरीत्या शिकण्याची संधी मिळाली नव्हती. पण आता काळ बदलला आहे. आता तुम्ही माझा प्रोफेशनल मास्टर क्लास करू शकता आणि माझ्या 30 वर्षाच्या प्रवासातून काही गोष्टी शिकू शकता.” (Akshay kumar launches an online professional acting classes)

या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार सांगत आहे की, कशाप्रकारे एका पात्रातून दुसऱ्या पात्रात जायचे. अक्षयने सांगितले की, तो कोणतेही पात्र निभावण्याच्या आधी स्वतःचं ऐकतो. अक्षयने सांगितले की, “मी एक मेथड अभिनेता आहे का? जोपर्यंत मी माझे प्रत्येक पात्र नीट समजून घेतो. मला एका पात्रातून दुसऱ्या पात्रात जाण्यास खूप वेळ लागत नाही, तर मग मी माझ्या हिशोबाने चालतो. ही माझी पद्धत आहे. एक पात्र कसे निभावले पाहिजे. यासाठी मी रिअल लाईफमधून प्रेरणा घेतो. तुम्ही निभावलेल्या एका छोट्या पात्रामुळे आयुष्यभर लक्षात राहत असता. या सेशनमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या करिअरमधील 30 वर्ष शेअर करणार आहे.”

त्याच्या या व्हिडिओला आतापर्यंत १० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज आणि ४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचे ‘बेलबॉटम’ आणि ‘सुर्यवंशी’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या सोबतच तो ‘अतरंगी रे’, ‘रामसेतू’, ‘रक्षाबंधन’, ‘बच्चन पांडे’ सोबत अनेक आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा