Sunday, February 23, 2025
Home नक्की वाचा भुल भूलैय्या 2 I अक्षय कुमारची कार्तिक आर्यनच्या भुमिकेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया, ‘त्याचा अभिनय…’

भुल भूलैय्या 2 I अक्षय कुमारची कार्तिक आर्यनच्या भुमिकेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया, ‘त्याचा अभिनय…’

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा ‘भुलभूलैय्या २’ चित्रपट सध्या सिनेमागृहात जोरदार धुमाकूळ घालत  आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत असून चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. ‘भुलभूलैय्या २’ चित्रपट २००७ मध्ये आलेल्या अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘भुलभूलैय्या’ चा रिमेक आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळेच प्रेक्षकांनी चित्रपटाच्या रिमेकमध्ये कार्तिक आर्यनच्या भूमिकेला नापसंदी दर्शवली होती. आता पहिल्यांदाच या चित्रपटावर अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे. 

समोर आलेल्या माध्यमांमधील बातम्यांनुसार अभिनेता अक्षय कुमारने ‘भुलभूलैय्या २’ चित्रपटाच्या यशाबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला की “त्याने अद्याप हा चित्रपट पाहिला नाही. पण त्याने चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली आहे. आणि तो लवकरच हा चित्रपट पाहणार आहे.” या आधी विद्या बालननेही चित्रपटाला शुभेच्छा दिल्या होत्या. या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट करत चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. भुलभूलैय्या चित्रपटात विद्या बालनने  मंजुलिकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना वेड लावले होते.

दरम्यान ‘भूल भुलैया 2’ ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी 20 मे रोजी चित्रपटाने 14.11 कोटींची कमाई केली होती. त्यात अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ आणि आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ मागे पडला आहे. कार्तिक आर्यनच्या चित्रपटासोबत कंगना राणौतचा ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल तिने कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन केले.

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर “हिंदी बॉक्स ऑफिसवरील दुष्काळ संपवल्याबद्दल भूल भुलैया 2 चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन,” असा कॅप्शन दिला होता. दरम्यान, अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘पृथ्वीराज’च्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. या चित्रपटात अक्षयच्या सोबत मानुषी छिल्लर दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा