Thursday, April 25, 2024

धक्कादायक! सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माने सोडला ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपट

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या आगामी बहुचर्चित ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचबरोबर ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपटही विविध कारणांनी  चर्चेत राहिला आहे. या चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत त्याचा मेहुणा आयुष शर्माही (Aayush Sharma) दिसणार आहे. पण आता ते होणार नाही. आयुष शर्माने ‘कभी ईद कभी दिवाला’ हा चित्रपट सोडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीने प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे. काय आहे दोघांमधील वादाचे कारण चला जाणून घेऊ.  

अभिनेता आयुष शर्मा आणि सलमान खान ‘अंतिम द फायनल  ट्रुथ’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र दिसले होते आणि आता दोघेही दुसऱ्यांदा स्क्रिन शेअर करणार होते. दोघेही आगामी ‘कभी ईद कभी दिवाली या चित्रपटात एकत्र काम करणार होते. मात्र आता   तसे होणार नाही. रिपोर्टनुसार, सलमानचा मेहुणा आयुष शर्मा क्रिएटिव्ह मतभेदांचे कारण देत प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.  आता आयुष आणि सलमान खान  यांच्यातील काही मुद्देही समोर आले आहेत. या कारणामुळे आयुषने या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आयुषने या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले होते. त्याने दिवसभराचे शूटिंगही पूर्ण केले होते.

दरम्यान सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटात पूजा हेगडे, राघव जुयाल आणि तेलुगु अभिनेता व्यंकटेश दग्गुबाती दिसणार आहेत. मुंबईतील विलेपार्ले येथील एका खास सेटवर चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. हा चित्रपट 31 डिसेंबरला रिलीज होणार आहे. म्हणजेच या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात चाहत्यांना सलमान खानच्या चित्रपटाने पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा