Thursday, June 13, 2024

‘या’ नवीन कार्यक्रमामुळे शैलेश लोढा यांनी दिला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला निरोप, होस्टच्या भूमिकेत दिसणार अभिनेता

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून  तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेचे नाव घेतले जाते. या कार्यक्रमातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना जवळची वाटते. अनेक वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. मात्र या कार्यक्रमातील प्रमुख अभिनेता असलेल्या तारक मेहताच्या भूमिकेतील शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी अलिकडेच मालिका सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यांच्या या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. या निर्णयामागील शैलेश लोढा यांचे कारण आता समोर आले असून एका दुसऱ्या कार्यक्रमामुळे ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून प्रसारित होत आहे . ही मालिका खूप लोकप्रिय आहे. या शोमधील प्रत्येक पात्राची वेगळी ओळख आहे. दुसरीकडे, कवी आणि अभिनेते शैलेश लोढा यांचे तारक हे पात्र या शोसाठी खूप खास तसेच महत्त्वाचे आहे, मात्र त्यांनी मालिका सोडल्याची बातमी समोर आली आहे. आता एक नवीन अपडेट समोर आले आहे की शैलेश लोढा एका नवीन कार्यक्रमाचे शूटिंग करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो या शोमध्ये होस्ट म्हणून दिसणार आहे.

समोर आलेल्या एका प्रोमोनुसार अभिनेता शैलेश लोढा ‘वाह भाई वाह’ या नवीन शोमध्ये दिसणार आहे. हा शो कवितेवर आधारित असेल, ज्यामध्ये उदयोन्मुख कवींच्या प्रतिभेला पुढे आणण्यासाठी व्यासपीठ दिले जाईल. जूनपासून शेमारू टीव्हीवर हा कार्यक्रम सुरू होणार आहे. शैलेश लोढा यांनी तारक मेहताचा शो सोडल्याच्या बातम्या येत असल्या तरी, निर्माते आणि अभिनेता शैलेश लोढा यांच्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. याशिवाय मालिकेच्या कोणत्याही सहाय्यक कलाकारानेही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा