Tuesday, May 28, 2024

Raksha Bandhan | चित्रपटाचे टायटल सॉन्ग ‘धागों से बांधा’ रिलीझ, ऐकल्यानंतर चाहत्यांना आठवले ‘तेरे नाम’

बॉलिवूडच्या अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रक्षा बंधन’ मधील ‘धागों से बांधा’ हे टायटल सॉन्ग रिलीझ झाले आहे. जे खूपच भावनिक आहे. हे गाणे अरिजित सिंग (Arijit Singh) आणि श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) यांनी गायले आहे. या गाण्याचे बोल इर्शाद कामिल यांनी लिहिले असून, संगीत हिमेश रेशमिया (Himesh Reshamiya) यांचे आहे. हे गाणे अक्षय आणि त्याच्या ऑन-स्क्रीन बहिणींवर चित्रित करण्यात आले आहे.

गाण्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यात अक्षय कुमारच्या बहिणीचे लग्न होताना दिसत आहे. दरम्यान, त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे फ्लॅशबॅक प्ले होतात. या गाण्यात भाऊ-बहिणीचे प्रेम दाखवण्यात आले आहे. बहिणीचे लग्न पाहून भावाला खूप आनंद होतो, पण तिला निरोप देणे त्याला फार कठीण जाते. गाण्यात भाऊ आणि बहिणीला एकत्र अश्रू ढाळताना पाहून तुमचेही डोळे ओलावू शकतात. (akshay kumar s dhaago se baandhaa song release)

याचे संगीत मुख्यत्वे सलमान खानच्या (Salman Khan) ‘तेरे नाम’ या चित्रपटाची आठवण करून देणारे आहे. अक्षय कुमारने हे गाणे त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे.

आनंद एल राय दिग्दर्शित ‘रक्षाबंधन’ची कथा भावा-बहिणीच्या प्रेमाच्या नात्याशिवाय, समाजात प्रचलित असलेल्या हुंड्याच्या दुष्ट प्रथेलाही दाखवते. या चित्रपटात अक्षय कुमारला चार बहिणी आहेत. सहजमीन कौर, दीपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत या बहिणींच्या चार भूमिका आहेत. भूमी पेडणेकरही (Bhumi Pednekar) महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओ, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स करत आहेत. हा चित्रपट रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा