Wednesday, February 21, 2024

लगातार फ्लॉप चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारच्या तामिळ रिमेक सिनेमाची घोषणा, ट्रोल करत फॅन्स म्हणाले ‘डिझास्टर’

एकेकाळी एकापाठोपाठ एक असे हिट सिनेमे देणारा अभिनेता म्हणून अक्षय कुमार ओळखला जायचा. मात्र आता मागील काही काळापासून तो लागतात फ्लॉप सिनेमे देत आहे. त्याचा येणार प्रत्येक चित्रपट फ्लॉपच ठरत आहे. त्यामुळे आता अक्षयला आणि त्याच्या चाहत्यांना त्याच्या हिट सिनेमाची प्रतीक्षा आहे.

अशातच आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने नुकतीच त्याच्या आगामी नवीन सिनेमाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. लवकरच खिलाडी कुमार साऊथ सुपरस्टार सूर्याच्या ‘सोरारई पोटरु’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री राधिका मदान मुख्य भूमिका साकार आहे. या सिनेमाची घोषणा काही महिन्यांपूर्वीच अक्षयने केली होती. आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख त्याने जाहीर केली आहे. मात्र ही तारीख जाहीर करताना अक्षय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.

अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या ‘सोरारई पोटरु’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेक असलेल्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या सिनेमाचे त्याने अद्याप नाव जाहीर केले नसले तरी त्याला ‘प्रोडक्शन नंबर 27’ म्हटले जात आहे. अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “आम्ही उंच उडण्यासाठी तयार आहोत. ‘प्रोडक्शन नंबर 27′ येत्या १ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारने ही पोस्ट शेअर केल्यानंतर आता नेटकाऱ्यानी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सगळ्यांनीच त्याला रिमेक न करण्याचा सल्ला दिला आहे. एकाने त्याच्या कमेंट मध्ये लिहिले, “कृपया रिमेक चित्रपट बनवणे बंद करा.”, दुसऱ्याने लिहिले, “अजून एक रिमेक. तू फक्त रिमेक चित्रपट का निवतोस. आम्हाला फ्रेश कंटेन्ट पाहिजे आहे.’ अजून एकाने लिहिले, “क्वांटिटीपेक्षा अधिक क्वालिटीवर लक्ष दे.” , एकाने लिहिले, “एक रिमेक फ्लॉप झाल्यावर देखील हा सुधारला नाही.” तर एकाने लिहले, “अजून एक डिझास्टर येणार’.

दरम्यान ‘सोरारई पोटरु’ हा मूळचा तामिळ सुपरहिट सिनेमा असून, हा २०२० साली अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात आला होता. यात सूर्य आणि अपर्णा बालमुरली यांनी भूमिका साकारली होती. सांगितले जात आहे की, या सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये सूर्या एक पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचे आणि हिंदी रिमेकचे दिग्दर्शन सुधा कोंगारा करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! ‘या’ मराठी अभिनेत्रीने वयाच्या पन्नाशीमध्ये बांधली पुन्हा लगीनगाठ, व्हिडिओ झाला व्हायरल

माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

हे देखील वाचा