Tuesday, June 25, 2024

ओटीटीवर अक्षय कुमारचाच जलवा, डिझ्नी हॉटस्टारने तब्बल ‘इतक्या’ कोटीला खरेदी केला ‘अतरंगी रे’

अनेक दिवसानंतर पुन्हा एका देशभरात सर्वत्र थिएटर चालू झाले आहेत. थिएटर चालू झाल्यानंतर लगेचच अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित केला गेला आहे. या चित्रपटाने खूप चांगली कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत २०० कोटीपेक्षाही जास्त कमाई केली आहे. अक्षय कुमार बॉक्सऑफिसचा खिलाडी तर आहेच. परंतु आता तो ओटीटीचा देखील खिलाडी झाला आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’‌ला डिझ्नी हॉटस्टारने खूप मोठी रक्कम देऊन खरेदी केले आहे.

‘सूर्यवंशी’ चित्रपटाची बक्कळ कमाई झाल्यानंतर आता त्याचा आगामी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याला आनंदाची बातमी मिळाली आहे. ‘अतरंगी रे’ चित्रपटाला डिझ्नी हॉटस्टारने २०० कोटी रुपये देऊन खरेदी केला आहे. माध्यमातील वृत्तानुसार हॉटस्टारवर‌ प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांपैकी एक सगळ्यात मोठी डील आहे. २०० कोटी ही ओटीटीसाठी खूप मोठी रक्कम आहे. (Akshay Kumar shines on OTT too Disney plus hotstar bought the film atrangi re for 200 crores )

ओटीटीवर या आधी अनेक चित्रपट विकले गेले आहेत, परंतु ही आतापर्यंतची सर्वात महाग डील आहे. याआधी त्याचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट देखील खरेदी केला होता. तो १२५ कोटी रुपयाला खरेदी केला होता. त्यानंतर सलमान खानच्या एका चित्रपटाची देखील डील झाली होती. ती डील १९० कोटी रुपये एवढी झाली होती. परंतु त्यात इतर देखील काही गोष्ट समाविष्ट होत्या. हॉटस्टारने अजय देवगणचा ‘भुज’ हा चित्रपट १०० कोटीला खरेदी केला होता. कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ हा चित्रपट नेटफ्लिक्सने १३५ कोटी रुपयाला खरेदी केला होता. तसेच सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशाह’ हा चित्रपट अमेझॉनने ७० कोटीला खरेदी केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा