चित्रपटसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. आपण घरामध्येच क्वारंटाईन असून डॉक्टरांशी संपर्क साधत असल्याचे अक्षयने सोशल मीडियावरून सांगितले आहे. यानंतर त्याचे चाहते आणि कलाकार तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
अक्षय कुमारचे वक्तव्य
अक्षयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत म्हटले की, “तुम्हा सर्वांना सांगायचं आहे की, आज सकाळीच माझी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सर्व नियमांचे पालन करत मी स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी घरामध्येच क्वारंटाईन आहे आणि आवश्यक वैद्यकीय काळजी घेत आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, जे कोणी माझ्या संपर्कात आले आहे, त्यांनी स्वत: ची चाचणी करावी आणि आपली काळजी घ्यावी. लवकरच ऍक्शनमध्ये पुनरागमन करेल.”
???????? pic.twitter.com/w9Q7m54BUN
— Akshay Kumar (@akshaykumar) April 4, 2021
‘रामसेतू’ चित्रपटाची शूटिंग
अक्षय कुमार सध्या आपल्या आगामी ‘रामसेतू’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. अशामध्ये आता तो शूटिंगमधून ब्रेक घेत घरातच क्वारंटाईन झाला आहे. यासोबतच अक्षयने आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘रामसेतू’मधील आपला पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली होती.
अक्षयपूर्वी ‘या’ कलाकारांना कोरोनाची लागण
विशेष म्हणजे अक्षयपूर्वी रणबीर कपूर, नीतू कपूर, संजय लीला भन्साळी, विक्रांत मैसी, आलिया भट्ट, मिलिंद सोमण, परेश रावल यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग
-‘आठ वर्ष डेटिंग केल्यानंतर सलमानने मला फसवलं,’ ‘या’ अभिनेत्रीने केलाय गंभीर आरोप