Friday, August 8, 2025
Home बॉलीवूड अक्षय कुमारने राजेश खन्ना यांना भेटण्यासाठी पाहिली होती कितीतरी तास वाट, पुढे बनला त्यांचाच जावई

अक्षय कुमारने राजेश खन्ना यांना भेटण्यासाठी पाहिली होती कितीतरी तास वाट, पुढे बनला त्यांचाच जावई

अक्षय कुमारचे (akshay kumar) नाव आज इंडस्ट्रीतील टॉप स्टार्सपैकी एक आहे. अक्षय देखील आज बॉलिवूडचा सर्वात महागडा स्टार आहे. मात्र, अक्षय कुमारला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आज आम्ही तुम्हाला अक्षय कुमारच्या स्ट्रगलच्या दिवसातील एक किस्सा सांगणार आहोत. माध्यमातील वृत्तानुसार, स्ट्रगलच्या दिवसांमध्ये अक्षय कुमार प्रत्येक व्यक्तीला भेटायला जायचा जो त्याला चित्रपटांमध्ये ब्रेक द्यायचा. याच क्रमात अक्षय कुमार एकदा राजेश खन्ना (rajesh khanna) यांच्यापर्यंत पोहोचला होता. अक्षय कुमारला कुठूनतरी कळले की काका चित्रपट बनवणार आहेत.

या चित्रपटाचे नाव होते ‘जय शिव शंकर’.माध्यमातील वृत्तानुसार अक्षय कुमारही या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी राजेश खन्ना यांच्या बंगल्यावर गेला होता. अक्षय कुमारही अनेक तास तिथे उभा राहिला पण तो राजेश खन्ना यांना भेटू शकला नाही.

चंकी पांडेला (chanki pandey) हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता आणि अक्षय कुमारच्या वाट्याला केवळ निराशाच आली होती, असं म्हटलं जातं. हा चित्रपट कधीच प्रदर्शित होऊ शकला नसला तरी त्याच दरम्यान ऑडिशनसाठी आलेल्या अक्षय कुमारची भेट राजेश खन्नाची मुलगी ट्विंकल खन्ना हिला नक्कीच झाली होती.

ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला काही टिप्स दिल्या होत्या, तसेच त्याला प्रेरित केले होते, असे म्हटले जाते. काळाचा बदल पहा की नंतर अक्षय कुमार इंडस्ट्रीचा मोठा स्टार बनला आणि त्याचे लग्न राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्ना हिच्याशी झाले. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा विवाह १७ जानेवारी २००१ रोजी झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा