Thursday, April 25, 2024

लेक अनन्यासाठी धावून आला बाप चंकी पांडे, बोल्ड ड्रेसवर दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

बॉलिवूड स्टारकिड्सना बाहेरच्या व्यक्तीपेक्षा चित्रपटांमध्ये सहज प्रवेश असू शकतो. परंतू ते सोशल मीडियावरील ट्रोलिंगपासून वाचू शकत नाहीत. अनन्या पांडे (Ananya Pandey) कधी तिच्या अभिनय कौशल्यामुळे, कधी तिच्या बोलण्याच्या शैलीमुळे तर कधी कपड्यांमुळे ट्रोल झाली आहे. अलीकडेच करण जोहरने (Karan Johar) आयोजित केलेल्या पार्टीत अनन्याने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिच्या ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. इंस्टाग्रामवर युजर्सनी तिच्या ड्रेसिंग सेन्सला लक्ष्य केले आणि अश्लील कमेंट करण्यास सुरुवात केली. तिचे वडील चंकी पांडे सांगतात की, त्यांनी कधीही त्यांच्या मुलींना कपड्यांबाबत कोणताही सल्ला दिला नाही. तिला जे आवडते ते ती घालते.

मुलींचे करतात चांगले संगोपन
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत चंकी पांडे म्हणाले की, “पालक म्हणून आम्ही तिला कधीच सांगितले नाही की, काय घालावे आणि काय घालू नये. आम्ही आमच्या दोन्ही मुलींचे खूप चांगले संगोपन केले आहे आणि त्या खूप संवेदनशील आहेत. अनन्या आज शोबिझच्या जगात आहे आणि तिला ग्लॅमरस दिसणे गरजेचे आहे. तिने आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

मुलींच्या पेहरावावर चंकी पांडे म्हणाले की, “मला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे. ती म्हणजे माझ्या मुलींमध्ये एक प्रकारचा निरागसपणा असतो. मला वाटते की, ती काहीही परिधान करू शकते आणि अश्लील दिसल्याशिवाय कॅरी करू शकते.”

स्वतःवर हसायला शिकली
अनन्याला ट्रोल करताना चंकी पांडे म्हणतात की, “मी अनन्याला सांगतो की, निदान लोक तुझ्याबद्दल बोलतात, मग ती चांगली असो किंवा वाईट. आम्ही खात्री करतो की आम्हाला ट्रोल्सची पर्वा नाही. ती स्वतःवर हसायला शिकली आहे.”

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर अनन्या पांडेचा चित्रपट ‘गहराइया’ गेल्या महिन्यात ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी आहेत. अनन्याचा आगामी चित्रपट ‘लायगर’ आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा