Monday, July 1, 2024

अरे बापरे! अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ चित्रपट ‘या’ देशांमध्ये बॅन? कारण जाणून व्हाल हैराण

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री वाणी कपूर यांचा ‘बेलबॉटम’ हा चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. कोरोना काळामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे हा चित्रपट प्रदर्शनापासून वंचित राहत होता. अखेर बऱ्याच महिन्यांनी हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. बहुप्रतिक्षित ‘बेलबॉटम’ १९ ऑगस्टला प्रदर्शित झाला. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. मात्र, आता प्रेक्षक चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत. असे असले, तरीही काही अरब देशांनी चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे.

या चित्रपटामुळे त्यांची प्रतिमा खराब झाल्याचा आरोप केला आहे. सौदी अरेबिया, कुवैत आणि कतारमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. या देशांच्या सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील एका दृश्याबद्दल आक्षेप घेतला आहे. रंजीत एम तिवारी दिग्दर्शित ‘बेलबॉटम’मध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त लारा दत्ता, वाणी कपूर, आदिल हुसेन आणि हुमा कुरेशी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

भारतातील पहिले गुप्त ऑपरेशन या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. दरम्यान, चित्रपटाच्या दुसऱ्या सहामाहीत अपहरणकर्ते लाहोरहून दुबईला विमान कसे नेतात हे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट १९८४ मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीच्या सैन्याने अपहरणकर्त्यांना त्यांच्या तावडीत घेतले. त्यानंतर संरक्षण मंत्री मोहम्मद बिन रशीद यांनी परिस्थिती कशी हाताळली आहे, हे सर्व दाखवण्यात आले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, चित्रपटात दाखवण्यात आले आहे की, भारतीय अधिकारी हे गुप्त मिशन कसे पार पाडतात, ज्याची माहिती तेथील संरक्षणमंत्र्यांनाही नसते. चित्रपटातील या सीनमुळे तेथील सेन्सॉर बोर्डाने नाराजी व्यक्त केली आणि त्याच्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लईच भारी! उर्मिला कोठारेनं सुंदर फोटो केले शेअर; दिसतेय एकदम बिनधास्त

-सारा- इब्राहिमपासून ते रणबीर- रिद्धिमापर्यंत ‘या’ बहीण- भावांच्या जोड्या आहेत खूपच प्रसिद्ध; एकमेकांवर ओवाळून टाकतात जीव

-लहानपणापासूनच होती अभिनयाची आवड; ‘तेरे नाम’नंतर उंचावला भूमिकाचा चित्रपटातील आलेख, आज आहे खूपच ग्लॅमरस

हे देखील वाचा