अभि- लतीची ऑफस्क्रीन मस्ती! व्हायरल फोटोंना चाहत्यांची पसंती


‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालत आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले लतिका आणी अभिमन्यूला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. लतिका अर्थातच अभिनेत्री अक्षया नाईकने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक विशेष ओळख निर्माण केली आहे. सोबतच समीर परांजपेला देखील बरीच लोकप्रियता मिळाली आहे. यांची जोडी चाहत्यांना चांगलीच भावली आहे.

नुकतंच या जोडीचे काही फोटो समोर आले आहेत, जे तूफान व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये अक्षया आणि समीरने पारंपारिक वेशभूषा परिधान केली आहे. शिवाय ते दोघे वडाच्या झाडाजवळ उभे राहून मस्ती करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या या फोटोला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील कमालीची दिसत आहेत.

वास्तविक हे फोटो अक्षयाने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत अक्षयाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. सगळ्याच गोष्टी कधी सुरळीत पार पडत नाहीत. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आणि अनेकदा ती वेळ चुकते. ती ठीक होण्यासाठी किंवा करण्यासाठी संय्यम ठेवावा लागतो. आतापर्यंत प्रेम करत आलात तसच पुढे पण करत रहाल अशी अपेक्षा.” (akshaya naik shared offscreen masti with co-star samir paranjape)

अक्षयाबद्दल बोलायचे झाले, तर ती बऱ्याच हिंदी मालिकेमध्ये दिसली आहे. लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ मध्ये तिने अनन्याची भूमिका साकारली होती. अभिनयाशिवाय तिला गायन आणि नृत्यामध्येही विशेष आवड आहे. इतकेच नव्हे, तर अक्षया एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट देखील आहे. आता अभिनेत्री ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत झळकत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ’ स्टार यशने खरेदी केले कोटींचे आलिशान घर; पत्नी राधिकासोबत पूजा करताना दिसला अभिनेता

जेव्हा वडिलांसोबत चित्रपट बघताना अचानक इंटीमेट सीन यायचा, तेव्हा…; तापसीने सांगितला ‘तो’ किस्सा

-महिमा चौधरी ट्रोलर्सच्या निशाण्यावर; मंदिरा बेदीच्या पतीच्या मृत्यूवर ‘अशाप्रकारे’ दुःख व्यक्त केल्याने नेटकरी झाले नाराज


Leave A Reply

Your email address will not be published.