जेव्हा वडिलांसोबत चित्रपट बघताना अचानक इंटीमेट सीन यायचा, तेव्हा…; तापसीने सांगितला ‘तो’ किस्सा


‘हसीन दिलरुबा’ या आगामी चित्रपटामुळे सध्या खूप चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू होय. या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे देखील दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यावरून प्रेक्षकांना या चित्रपटाची आस लागली आहे. तिन्ही कलाकारांची एक मुलाखत झाली, तेव्हा तिघांना विचारले होते की, ते कधी हॉट चित्रपट बघताना पडकले गेले होते का ?? यावर त्यांनी उत्तरं दिली आहेत. चला तर पाहुयात कलाकारांनी नक्की काय उत्तरं दिली.(Tapasee pannu says intimate scenes comes while watching film with dad)

हे प्रश्न विचारल्यावर विक्रांत मेस्सीने या गोष्टीचा स्वीकार केला की, तो ऍडल्ट फिल्म बघत होता. त्यावेळी त्याच्या मावशीने पकडले होते. हर्षवर्धन राणेने देखील सांगितले की, त्याने एक बी ग्रेड चित्रपट पाहिला होता. परंतु त्याने सांगितले की, केवळ १-२ सीनसाठी त्याला पूर्ण बोरिंग चित्रपट पाहायला लागला होता. यावेळी तापसी पन्नूने सांगितले की, मोठे झाल्यावर परिवारासोबत बसून चित्रपट बघणे खूप टेन्शनचे असायचे, जेव्हा एखादा इंटीमेट सीन यायचा.

तापसीने सिद्धार्थ कननच्या एका मुलाखतीत सांगितले की, “पप्पा साधारण इंग्लिश ऍक्शन चित्रपट जास्त बघतात. आमच्याकडे एकच टीव्ही होता. त्यामुळे पप्पा जेव्हा टीव्ही बघायला सुरुवात करायचे, तेव्हा जे लागलेलं असेल, ते बघण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसायचा. आम्ही चित्रपट बघण्यासाठी बाहेर जात नसायचो. चित्रपटात लव्ह मेकिंग आणि इंटीमेट सीन तर असायचा आणि ही गोष्ट खूपच सामान्य आहे. परंतु हे तेव्हा खूप विचित्र असतं, जेव्हा तुमची किशोरवयीन मुलगी तुमच्या शेजारी बसलेली असते. आम्ही तिथेच बसलेलो असायचो. आम्हाला घाम येत असतं. आम्ही हा विचार करायचो की, आता नक्की काय करायचं ?? तेव्हा मधेच आम्ही पाणी प्यायला जायचो, नाहीतर चॅनल बदलायचो. असं माझ्यासोबत झालं आहे.”

‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट शुक्रवारी (२ जुलै) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तापसी पन्नू यासोबतच ‘लक्ष्मी रॉकेट’, ‘दोबारा’, ‘लूप लपेटा’ आणि ‘शाबास मिठू’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू

‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

तापसीवर कंगनाची आगपाखड! म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’


Leave A Reply

Your email address will not be published.