‘केजीएफ’ स्टार यशने खरेदी केले कोटींचे आलिशान घर; पत्नी राधिकासोबत पूजा करताना दिसला अभिनेता


दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार यश हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. यशचे चाहते केवळ दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतच नव्हे, तर आज संपूर्ण भारतात आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत देखील तो चांगलाच लोकप्रिय आहे. त्याची तगडी फॅन फॉलोविंग आहे. त्याचे चित्रपट बघण्यासाठी चाहते वेडे होतात. त्याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये जवळपास २० चित्रपट केले आहेत. जे सगळे सुपरहिट सिद्ध झाले आहेत. ‘केजीएफ’ चित्रपटानंतर त्याच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आता सगळे ‘केजीएफ २’ ची आतुरतेने वाट बघत आहेत. अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की, यशचे खरे नाव नवीन कुमार गौड़ा हे आहे. तो आधी कन्नड टीव्ही मालिकांमध्ये काम करत होता. ( Sauth superstar yash buy new house, new hause photo viral on social media)

नेहमीच त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत असणारा यश यावेळी एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. अभिनेत्याने एक आलिशान घर खरेदी केले आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. तो त्याच्या नवीन घरात त्याच्या पत्नीसोबत पूजा करताना दिसत आहे. त्यांचे घर खूप सुंदर आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यश त्याच्या नवीन घरात त्याच्या परिवारासोबत पूजा करताना दिसत आहे. त्याच्या नवीन घराचे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. तसेच सगळे त्याला कमेंट करून अभिनंदन करत आहेत. माध्यमातील वृत्तानुसार यश जवळपास ५० कोटी प्रॉपर्टीचा मालक आहे. बंगळूरूमध्ये यशचा चार कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे.

व्हायरल होत असणाऱ्या एका फोटोमध्ये यशच्या घरात सोफा सेट दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये यश त्याची पत्नी राधिका पंडितसोबत बसलेला दिसत आहे. इतर फोटोंमध्ये यश त्याच्या पत्नीसोबत घराची पूजा करताना दिसत आहे. यशने २०१६ साली कन्नड अभिनेत्री राधिकासोबत लग्न केले आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचे नाव आर्या तर मुलाचे नाव यथर्व आहे.

यश खूप ऐशोआरामाचे आयुष्य जागत आहे. त्याला गाड्यांची देखील खूप आवड आहे. यशकडे ऑडी क्यू ७ आणि रेंज रोवर यांसारख्या गाड्या आहेत.

यश त्याच्या चित्रपटासाठी भली मोठी रक्कम आकारात असतो. परंतु आतापर्यंत त्याच्या वडिलांनी त्याचे खूप मेहनत करून पालनपोषण केले आहे. यशचे वडिल अरुण कुमार हे एक बस ड्रायव्हर आहेत. खास गोष्ट म्हणजे, ते आजही गाड्या चालवतात. यशचे वडिल म्हणतात की, ते हे प्रोफेशन कधीच सोडणार नाही. कारण यामुळे त्यांचा मुलगा आज एवढा मोठा झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू

‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

तापसीवर कंगनाची आगपाखड! म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’


Leave A Reply

Your email address will not be published.