बॉलिवूडमधील अफेअर्स प्रेक्षकांसाठी काही नवीन नाहीयेत. बॉलिवूडमध्ये अनेक अफेअर, ब्रेकअप, लग्न या गोष्टी नेहमीच जोरदार चर्चेत असतात. त्यात यावर्षी तर अनेक कलाकार लग्न बंधनात अडकले आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे. अशातच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे रिलेशन जोरदार चर्चेत आहे. त्यांच्या अफेअरच्या सर्वत्र चर्चा चाललेल्या असतात. जरी त्यांनी अधिकृतरीत्या त्यांच्या नात्याची घोषणा केली नसली, तरीही सोशल मीडिया पोस्टवरून ते त्यांच्या रिलेशनबाबत माहिती देत असतात. अशातच रणबीर आणि आलियाचा एक रोमँटिक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये रणवीर आलियाला किस करताना दिसत आहे.
खरंतर आलियाची स्टायलिस्ट लक्ष्मी लहरने इंस्टाग्राम अकाऊंटवर आलियाचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये आलिया तिच्या घरात पोझ देताना दिसत आहे. तिच्या या फोटोतील लूक्सचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. यासोबत या फोटोमधील आणखी एक गोष्ट चांगलीच चर्चेत आली आहे. ती म्हणजे आलियाच्या मागे असणाऱ्या भिंतीवरील दोन फोटो. भिंतीवर असणाऱ्या एका फोटोमध्ये पेंटिंग दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये आलियासोबत रणबीर कपूर दिसत आहे. (Alia Bhatt and Ranbir Kapoor spotted a romantic picture in a Instagram post by her stylist)
या फोटोमध्ये आलियाने जॅकेट, शॉर्ट्स आणि हाय बुट्स घातलेले आहे. आलिया कॅमेऱ्याकडे बघत आहे. तर रणबीर तिच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. हा फोटो रणथम्बॉर नॅशनल पार्क ट्रिप दरम्यानचा आहे. ते दोघेही या वर्षाच्या सुरुवातीला तिथे गेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य देखील तिथे गेले होते.
रणबीर आणि आलिया मागील तीन वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. ते मागच्या वर्षी लग्न देखील करणार होते. परंतु कोरोनामुळे ते रद्द करण्यात आले. आलियाची रणबीरची आई आणि बहिण यांच्याशी देखील खूप चांगली बॉंडिंग आहे. त्यांचे फोटो देखील अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लईच भारी! उर्मिला कोठारेनं सुंदर फोटो केले शेअर; दिसतेय एकदम बिनधास्त