बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) हिच्या प्रेग्नंसीची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर आलियाने आपल्या चाहत्यांना गोड बातमी असून रणबीर आलियाच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. आलिया रणबीर आई-वडील झाले आहेत. मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर कपूर कुटुंबात जल्लोषाचं वातावरण आहेत. आज सकाळी आलियाला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी रणबीर कपूर(Ranbir Kapoor) ही रुग्णालयात उपस्थित होता. गेल्या काही दिवसांपासून आलियाच्या गुड न्युजची चर्चा होती.
आलियाने बाळाला दिला जन्म
खरं तर, जेव्हापासून आलिया आई झाल्याची बातमी समोर आली आहे. तेव्हापासून, कुटुंब आणि मित्रांव्यतिरिक्त, चाहते देखील तिच्या बाळाच्या जगात येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आज सकाळी आलियाने रिलायन्स रुग्णालयामध्ये बाळाला जन्म दिला. सध्या बाळ आणि आलिया दोघेही निरोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी बाळाच्या जन्मापूर्वी आलियाने थाटामाटात बेबी शॉवर साजरा केला होता. ज्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यामध्ये आलिया पिवळ्या रंगाच्या सुंदर सूटमध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिची प्रेग्नेंसीचा तेज स्पष्ट दिसत होता.
View this post on Instagram
आलिया-रणबीर ‘या’ वर्षी लग्नगाठ बांधले
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर याचवर्षी 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकले होते. दोघांचे लग्न अगदी साधेपणाने त्यांच्या घरी झाले. ज्यामध्ये आलिया नो मेकअप लूकमध्ये दिसली होती. दोघांच्या या लग्नाला चाहत्यांकडूनही भरभरून प्रेम मिळाले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पूर्वी साउथ चित्रपटांची खिल्ली उडवायचे…’, म्हणत केजीएफ स्टाररने साउथ इंडस्ट्रीवर केले मोठे वक्तव्य
अण्णाची ओटीटीवर दमदार एन्ट्री! ‘धारावी बॅंक’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित










