Wednesday, March 19, 2025
Home बॉलीवूड खूप झालं आता! ‘ब्रम्हास्त्र’च्या प्रमोशनवरुन रणबीर कपूर संतापला, पाहा काय आहे प्रकरण?

खूप झालं आता! ‘ब्रम्हास्त्र’च्या प्रमोशनवरुन रणबीर कपूर संतापला, पाहा काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांचा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झाला, आता लवकरच ओटीटीवर येत आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉट स्टार वर 4 नोव्हेंबर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी कोणतीही कसर सोडली नाही. प्रेग्नंट असूनही आलियाने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावली. म्हणून या चित्रपटाने जगभरात 400 कोटीपेक्षा जास्त कमाई केली. रणबीर आणि आलिया यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

सध्या सोशल मीडियावर रणबीरचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. यामध्ये तो ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनं नाव ऐकताच भडकलेला पहायला दिसतो. नेमकं रणबीरला काय झालंय? आलिया भट्टने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रणबीर कपूरचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये रणबीर कपूर फोनवर कोणाशी तरी बोलताना दिसत आहे. रणबीर ‘नही भाई हो गया! मी यापूर्वीच ‘ब्रह्मास्त्र’चे प्रमोशन केले आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ‘ब्रह्मास्त्र’ येतोय मग प्रमोशनचा अर्थ काय? प्रमोशन, प्रमोशन प्रमोशन…. इतकं की आलियाने चित्रपटात शिव-शिवा म्हटलं नसेल. ‘डान्स करून करून मी स्वत: भूत बनलोय, आलियाचा घसा बसलाय, 150 ड्रोन्स उडवले गेले, 250 टन लाडू वाटले गेले, आता अजून काय करू, सर्वांच्या घरी जाऊ का’, प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगतो की सज्जनांनो, डिस्ने प्लस हॉट स्टारवर आमचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट येत आहे. कृपया पहा… कृपया पहा… प्रकाश येत आहे, प्रकाश येत आहे. प्रकाश आला आहे. दिवाळीच्या शुभेच्छा!’

 

View this post on Instagram

 

यानंतर रणबीर कपूर व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे, ‘अयानला काय वाटतं की ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनशिवाय माझ्या जीवन नाही. यार,“मी पिता होणार आहे, माझ्या खांद्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत”. अचानक रणबीरला दुसरा फोन आला, जो ‘ब्रह्मास्त्र’ दिग्दर्शक अयान मुखर्जीचा आहे. रणबीर आधीच बोलत असलेल्या व्यक्तीला म्हणतो, ‘मी तुला नंतर कॉल करतो.’ त्यानंतर रणबीर अयान मुखर्जीला म्हणतो, ‘हो अयान! मी नक्की प्रमोशन करेन. सर्वांना ब्रह्मास्त्र पहावे लागेल, हो सर, प्रकाश येत आहे. यानंतर रणबीर स्वत: कपाळला मारताना दिसतो. साहजिकच ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनसाठी रणबीरने हा नवीन मजेशीर मार्ग स्वीकारला आहे. ओटीटीवर येणार्‍या चित्रपटाची माहिती त्यांनी वेगळ्या पद्धतीने दिली आहे.

आलिया भट्टच्या या पोस्टवर यूजर्सच्या मजेदार कमेंट येत आहेत. यासोबतच सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत. दीपिका पदुकोणने आलियाच्या पोस्टवर हसणारा इमोजी पोस्ट केला आहे. त्याचवेळी, रणबीर कपूरची सासू सोनी राजदानने लिहिले आहे की, ‘खूपच क्यूट आणि मजेदार आहे.’ अभिनेता अर्जुन कपूरनेही अनेक हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत. इतर यूजर्सही व्हिडिओमध्ये रणबीरच्या स्टाइलचे कौतुक करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी केले ‘राम सेतू’चे कौतुक; म्हणाले, ‘सगळ्यांचे गैरसमज आता…’

डेंग्यू झाल्यानंतर सलमाननं प्रकृतीबाबत दिली अपडेट; बीएमसीला इमारतीत सापडल्या डेंग्यूच्या अळ्या

हे देखील वाचा