Thursday, February 22, 2024

लावणीसम्राज्ञी मेघा घाडगेंनी गौतमी पाटीलवर केली टिका; म्हणाली,’परकर वर करेन अन् पाण्याची…’

नृत्य कलाकार गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून फारच चर्चेत आहे. गौतमी तिच्या दमदार लावणीमुळे चात्यांचे लक्ष वेधत असते. तिची लावणी आणि सौन्दर्य चाहत्यांना अशाप्रकारे आकर्षित करतात की , तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर येताच प्रचंड व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी गौतमीच्या लावणी शोमध्ये चांगलीच गर्दी पहायला मिळाली. तिची एक झलक पाहण्यासाठी चात्यांनी तुफान गर्दी केली होती आणि त्यानंतरच खरा वाद सुरू झाला.

कलाकार गौतमी पाटील (gautami patil) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये गौतमी लावणी सादर करताना अंगावर पाणी घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ बघता सोशल मीडिया युजर्स गौतमी चांगलेच ट्रोल करत आहेत. अनेकांनी तिच्या लावणीवर टीका करत हा अश्लिल प्रकार असल्याचं म्हटलं आहे. अशातच आता लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे (Megha Ghadge) यांनीही गोतामीच्या लावणीवर आक्षेप घेतला आहे.

मेघा घाडगे यांनी फेसबूकवर गौतमीवर टीका करत लिहिले,”खूप खूप धन्यवाद गौतमी पाटील. आज तुला लावणी क्विन हा किताब मिळाला. माफ कर खूप चूक झाली. खरंतर अशी लावणी असते हे आमच्या पूर्वज्यांना ही माहित न्हवतं, पुस्तकातून चुकीचा लोककलेचा अभ्यास शिकवला. कृपाकारून बंद करा हे सगळं. विनाकारण लोककलवांतांनी पिढ्यान पिढ्या कलेच्या नावाखाली पुरस्कार घेत गेले, आत्ता माझे डोळे उघडले,”

मेघा घाडगे पुढे म्हणाल्या,”मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन आणि पाण्याची बाटली घेऊन अंगावर घेत ओली चिंब होईपर्यंत ओतेन, खूप वाईट वाटलं ऐकून. पण तुझी ती भन्नाट अश्लील अदाकरी बघायला कोणाला नाही आवडणार? मला तुझी शिष्य बनवशिल का??” असे मेघा घाडगे यांनी आपल्या फेसबूक पोस्टद्वारे म्हंटले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पुनीत इस्सर सोबत जेवू नकोस म्हणत ‘या’ अभिनेत्रीला एका महिलेने केले होते सावध!
डबल एक्सेल गर्ल! सोनाक्षी सिन्हाचे काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फुलले सौंद्रर्य

हे देखील वाचा