Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड आलिया भट्टने केले नणंदेच्या ‘क्रू’ चित्रपटाचे कौतुक, सोशल मीडियावर शेअर केली ‘अशी’ पोस्ट

आलिया भट्टने केले नणंदेच्या ‘क्रू’ चित्रपटाचे कौतुक, सोशल मीडियावर शेअर केली ‘अशी’ पोस्ट

तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन यांचा ‘क्रू’ चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. २९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग केली होती. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक तिन्ही नायिकांचे खूप कौतुक करत आहेत. इंडस्ट्रीतील सर्व स्टार्सही या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. करीना कपूरची वहिनी आलिया भट्ट हिने हा चित्रपट पाहिला आहे आणि त्यावर तिची प्रतिक्रया दिलेली आहे.

आलिया भट्टने ‘क्रू’ चित्रपट पाहिला आहे. यानंतर तिने तिचा अनुभव इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. चित्रपटाचे पोस्टर शेअर करून आलियाने निर्माती एकता कपूर आणि रिया कपूरसह तीन प्रमुख अभिनेत्रींना टॅग केले आहे. ‘या ‘क्रू’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे, असेही लिहिले आहे. या सर्व महिलांचे खूप खूप अभिनंदन.

शुक्रवारी क्रूने 9.25 रुपयांची ओपनिंग घेतली. आकडेवारीनुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 10 कोटींची कमाई केली आहे. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाचा देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 19.25 कोटींचा व्यवसाय झाला आहे. जगभरात या चित्रपटाने 20 कोटींचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझा आणि कपिल शर्मा यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केले आहे.

या चित्रपटाच्या कथेसोबतच त्याच्या संगीताचीही चर्चा होत आहे. यामध्ये माधुरी दीक्षितवर चित्रित करण्यात आलेल्या ‘खलनायक’मधील ‘चोली के पीचे क्या है’ हे गाणे रिक्रिएट करून करीना कपूरवर चित्रित करण्यात आले आहे. एकीकडे तरुणाई या गाण्याचे नवीन व्हर्जन पसंत करत आहे. त्याचवेळी काही लोक जोरदार टीका करत आहेत. मूळ गाणे गायलेल्या इला अरुणनेही हे गाणे रिक्रिएट होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘नो एंट्री’च्या सिक्वेलबद्दल अनिल कपूर भावाशी बोलत नाही, त्यामुळे बोनी कपूरने केले नाही कास्ट
वडिलांची कष्टाची प्रॉपर्टी विकून बनवला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट, रणदीप हुड्डाने केला मोठा खुलासा

हे देखील वाचा