बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) हि सध्या तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नेटफ्लिक्सच्या आगामी ‘हार्ट ऑफ स्टोन’चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. या चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटामध्ये जेमी डोर्नन आणि गॅल गॅडोट प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ॲक्शनवर आधारित असल्याचे फर्स्ट लूकमधून दिसते आहे. हार्ट ऑफ स्टोनचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचे दिसते आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 2023 मध्ये येणार आहे.
हार्ट ऑफ स्टोन चित्रपटाच्या फर्स्ट लूक रिलीज
हार्ट ऑफ स्टोन चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये दिसते आहे की, आलिया भट्ट देखील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. व्हिडिओची सुरुवात रस्त्यावरून आणि वाळवंटातून वेगाने जाणार्या बाइकच्या शॉट्सने होते. तेवढ्यात एक आवाज येतो, तुम्ही कशासाठी साइन अप केले हे तुम्हाला माहिती आहे…कोणी मित्र नाहीत, नातेसंबंध नाही. आपण काय करतो ते खूप महत्वाचे आहे…असे म्हटले जाते. त्यानंतर व्हिडीओमध्ये बरेच ॲक्शन सीन दाखवण्यात आले आहेत. गल गडॉटने सुपर वुमनची भूमिका केली होती. या चित्रपटात आलिया ‘काया धवन’ नावाच्या मुलीची भुमिका साकारत आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये आलिया भट्टचा दिसतोय दमदार अभिनय
चित्रपटाच्या फर्स्ट लूकच्या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट देखील दिसत आहे. यामध्ये आलियाचे देखील काही सीन्स दाखवण्यात आले आहेत. हार्ट ऑफ स्टोन या हॉलिवूड चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळते आहे. इतकेच नाही तर आलिया या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. यामुळे आलियाच्या भारतामधील चाहत्यांना या चित्रपटाबद्दल मोठे क्रेझ आहे.
आलिया भट्ट लवकरच करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलियासोबत रणवीर दिसणार आहे. याशिवाय ती फरहान अख्तरच्या जी ले जरा या चित्रपटातही दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा चित्रपट भारतीय नाही…’,छेल्लो शोला ऑस्करसाठी पाठवण्यावरून वाद पेटला
‘जंगलात राघू खूप असतात पण वाघ एकच…’, अमेय वाघची सुमित राघवनला टॅग करत खळबळजनक पोस्ट
अभिनेत्री ऐश्वर्या राय दुसऱ्यांदा होणार आई? व्हायरल व्हिडिओने रंगल्या चर्चा