Friday, April 26, 2024

आलिया भट्टचं डोहाळे जेवण! समोर आली पाहुण्याची यादी, पाहा कोणाकोणाला दिले निमंत्रण

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) एप्रिल 2022 मध्ये विवाहाच्या बंधनात अडकले. त्यानंतर काही महिन्यातच या दाम्पत्याने गुड न्यूज देऊन चाहत्यांना सरप्राइज केलं होतं. आलिया आणि रणबीर लवकरच आई-बाबा होणार आहेत. कपूर कुटुंबीय आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहेत.

माध्यमाच्या रिपोर्ट्सनुसार, आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ग्रॅंड सेलिब्रेशनसारखा होणार आहे. आलियाची आई सोनी राजदान (Soni Rajdan) आणि रणबीरची आई नीतू कपूर (Neetu Kapoor) या दोघांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. कपूर हाऊसमध्ये मोठ्या थाटात हा कार्यक्रम होणार आहे.

समोर आली पाहुण्याची यादी..
आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु कार्यक्रमाला कोण-कोणते पाहुणे येणार याची यादी तयार झाली आहे. याच महिन्यात हा कार्यक्रम होणार असून उत्तम मुहूर्त पाहून तारीख निश्चित करण्यात येणार आहे. कार्यक्रमात भट्ट आणि कपूर कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार आहेत.याशिवाय आलिया आणि रणबीरचे जवळचे मित्रांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. ग्रॅंड पार्टीला खास बनवण्यासाठी आलियाच्या मैत्रिणींना आवर्जुन बोलावण्यात आलं आहे. करीना कपूर, श्वेता बच्चन नंदा, नव्या नवेली नंदा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.

ब्रह्मास्त्रच्या सेलिब्रेशननंतर आणखी एक ग्रॅंड सेलिब्रेशन
आलिया आणि रणबीर स्टारर ब्रह्मास्त्र नुकताच रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट दमदार कमाई करतोय. त्यामुळे आलिया आणि रणबीरचा आनंद गगनात मावत नाही आहे. त्यात आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या जोडीला डबल सेलिब्रेशनची संधी मिळणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तुला दोन आई आहेत…’, म्हणत अली असगरच्या मुलांची उडवली होती खिल्ली, किस्सा ऐकून तुम्हीही व्हाल भावूक

परी म्हणू की, सुंदरा! जिनिलियाचे क्यूट फोटो पाहाच
आरआरआर ते विक्रम, ‘हे’ तमिळ चित्रपट 2022 मध्ये ठरलेत सुपरहिट

हे देखील वाचा