Tuesday, June 25, 2024

आलिया भट्टच्या आजोबांची प्रकृती चिंताजनक, आलिया भट्टने रद्द केला ‘हा’ महत्त्वाचा दौरा

बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या आभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. आलिया सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. मेकअप, भारीभरक्कम कपडे घालून चित्रपटांमध्ये मिरवण्यापेक्षा आलियाने तिच्यातल्या अभिनेत्रीला तासायला सुरुवात केली आणि आज आलिया बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. लहानपणापासून मिळालेल्या चित्रपटाच्या वातावरणाचा आलियाने तिचे करिअर घडवण्यासाठी चांगलाच वापर करून घेतला आहे.

आलिया (Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. आलिया ‘आयफा 2023’मध्ये सहभागी होण्यासाठी अबुधाबीला जाणार होती, मात्र आता आलियाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. आलियावर आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचे ढग दाटून आले आहेत. आजोबांची प्रकृती चिंताजनक असल्याने तिने परदेश दौरा रद्द केला आहे.

सोनी राझदानचे वडील नरेंद्र राझदान यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजदान आणि भट्ट कुटुंब सध्या कठीण परिस्थितून जात आहे. नरेंद्र राझदानची प्रकृती चिंताजनक असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य चिंतेत आहे. अभिनेत्री आलियाही सध्या अस्वस्थ दिसत आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, नरेंद्र राझदान यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना यापूर्वीही याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नरेंद्र राझदान यांना फुफ्फुस संसर्गाचा त्रास वाढला आहे. ते ९५ वर्षांचे आहेत. यावेळी आलियाला तिच्या आजोबांसोबत राहायचे असल्याने ती विमानतळावरून परतली.

दरम्यान, आलियाने शनिवारी तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ‘आयफा’ पुरस्कार जिंकला. मात्र, आलिया हा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित नव्हती.आलियाने आता यावर मौन सोडले आहे. आनंद शेअर करण्यासोबतच आलिया सर्वांची माफी मागतानाही दिसली आहे. (Alia Bhatt’s grandfather’s condition is critical)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘वेड’ चित्रपटाने आयफा 2023मध्ये मारली बाजी; ‘या’ विषेश पुरस्काराने अभिनेता सन्मानित
‘या’ सुपरस्टारला करायची होती ‘जंजीर’मध्ये भूमिका, अनेक कलाकारांनी नकार दिल्यावर अशी झाली सिनेमात अमिताभ बच्चन यांची एन्ट्री

हे देखील वाचा