आलिया भट्ट ही हिंदी चित्रपट जगतातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार्या आलिया भट्टने खुप कमी काळात आपला कसदार अभिनय आणि सौंदर्यामुळे बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर आलियाचा मोठा चाहता वर्ग आहे. आलिया सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. तिच्या अनेक फोटोंची चर्चा माध्यमांत होत असते. नुकताच आलियाने सोशल मीडियावर आपला हॉट फोटो अपलोड केला आहे, ज्यामधील तिच्या बोल्ड लूकमुळे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
नुकताच आलिया भट्टने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सूर्य किरणांच्या प्रकाशात काढलेला एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने स्ट्रॅपलेस निळ्या रंगाची बिकिनी घातलेली दिसून येत आहे. निळ्या रंगाच्या या बिकिनीमध्ये आलिया खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. आलियाने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये शेअर केला आहे. यावेळी तिने कसलाही मेकअप केला नसल्याचेही दिसत आहे.
निळी बिकिनी आणि केस मोकळी सोडलेली आलिया या फोटोत खूपच हॉट दिसत आहे. ती कॅमेऱ्याकडे बघून पोज देत आहे. या सुंदर फोटोच श्रेय तिने बहीण शाहीन शेट्टीला दिलं आहे.
आलिया भट्टच्या या सुपर हॉट लूकवर चाहते फिदा झाले आहेत. अवघ्या काही तासात फोटोला लाखो लाईक्स मिळाल्या आहेत. या प्रतिक्रियांमध्ये सर्वाधिक हार्ट आणि फायर ईमोजीचा समावेश आहे.
अशा प्रकारचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करताना आलिया क्वचित पाहायला मिळते. आलियाच्या अभिनेता रणबीर कपूर सोबतच्या बर्याच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
आलिया आणि अभिनेता रणबीर कपूरच्या प्रेम प्रकरणाची चर्चा कायम माध्यमांत होत असते. लवकरच दोघेही विवाह बंधनात अडकणार असल्याची माहितीही समोर आली आहे. परंतु या बातमीला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान आलिया भट्ट ही चित्रपट जगतातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या आगामी चित्रपटांची लिस्ट सुद्धा खुप मोठी आहे. ज्यामध्ये ‘ब्रम्हास्त्र’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘आर आर आर’, ‘डार्लिंग’ आणि ‘तख्त’ अशा धमाकेदार चित्रपटांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’