‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील अभिनय आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्न झाल्यानंतर, आलिया भट्टची (Alia Bhatt) लोकप्रियता खूप वाढली आहे. परिणामी आलिया भट्टचे नाव इंस्टाग्रामच्या टॉप ५ इन्फ्लुएंसर्सच्या यादीत समाविष्ट झाले आहे. या यादीत सामील होणारी ती एकमेव भारतीय आणि आशियाई अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे आलिया भट्ट आता ‘हार्ट ऑफ स्टोन’मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
‘या’ कारणामुळे वाढले फॉलोव्हर्स
आलिया भट्ट निःसंशयपणे आपल्या देशातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका करण्याव्यतिरिक्त, आलिया भट्टने ‘आरआरआर’मध्ये कॅमिओ रोल केला आहे आणि ती तिच्या स्वत: च्या निर्मिती संस्थेत (Eternal Sunshine Productions) देखील काम करत आहे. याशिवाय रणबीर कपूरसोबतच्या लग्नामुळे आलिया भट्टच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी सोशल मीडिया यूजर्सची उत्सुकता खूप वाढली आहे. (alia bhatt joins will smith zendaya and others as the only asian in the top 5 cinema influencers)
‘इतके’ आहेत आलियाचे फॉलोव्हर्स
आलिया भट्ट सध्या विल स्मिथ (Will Smith) (६४.७ दशलक्ष फॉलोअर्स) नंतर चौथ्या स्थानावर आली आहे. इंस्टाग्रामवर ६४.३ दशलक्ष फॉलोव्हर्ससह, अभिनेत्रीच्या प्रोफाइलवर ५.३२ टक्के एंगेजमेंट आहे. महत्त्वाचे म्हणजे, या यादीत फक्त अभिनेते किंवा सेलिब्रिटी आणि सिनेमाशी संबंधित कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रियांका चोप्राने मिळवले १३ वे स्थान
आलिया भट्टने केवळ पहिल्या पाचमध्येच स्थान मिळवले नाही, तर पहिल्या १० मध्ये स्थान मिळवणारी ती एकमेव भारतीय आहे. त्यानंतर या यादीत सर्वाधिक फॉलोव्हर्ससह प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) १३व्या स्थानावर आहे. त्याचबरोबर अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांनीही टॉप-२० मध्ये स्थान मिळवले आहे. आतापर्यंत कोणत्याही अभिनेत्याला २०व्या स्थानापर्यंत पोहोचता आलेले नाही. या यादीत अक्षय कुमार २३व्या स्थानावर आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा