बॉलिवूड स्टार आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. नुकताच आलिया भट्टचा डार्लिंग्स हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. याशिवाय, अभिनेत्री तिच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातील एका गाण्यासाठी एका खास कार्यक्रमात बेबी बंप दाखवताना दिसली. यादरम्यान रणबीर कपूरने आलिया भट्टसोबतचे अफेअर आणि लग्नानंतर अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दलही मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या. रणबीर आणि आलियाचा हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
एका मुलाखतीदरम्यान आलिया भट्टने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांबद्दल सांगितले. या दरम्यान आलियाने सांगितले की ती या सर्व गोष्टींकडे लक्ष न देता फक्त तिच्या कामावर लक्ष केंद्रित करते. करिअरच्या शिखरावर असताना एवढ्या लहान वयात लग्न, तिची निवड आणि नंतर लगेच मूल याविषयी निर्माण होणारे प्रश्नही आलिया भट्टने बोलून दाखवले.
आलिया भट्ट म्हणाली की “लोक तिच्या निवडीवर प्रश्नचिन्ह कसे विचारतात आणि म्हणतात की तू आता खूप लहान आहेस, आतापासून लग्न आणि मुलांची काय गरज आहे. यावर उत्तर देताना आलिया भट्ट म्हणाली की, “‘येथे फक्त वयाचा मुद्दा नाही. मी गेल्या 12 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे, मला वाटले की आता आपण लग्न केले पाहिजे आणि मग आम्ही मुलाचेही प्लॅनिंग केले.”
याशिवाय आलिया भट्ट दीर्घकाळ सैल-फिटिंग कपडे परिधान केल्याबद्दल देखील ट्रोल झाली आहे. आपला बेबी बंप लपवण्यासाठी ती असे करते असे अनेकवेळा बोलले जाते. याबद्दल अभिनेत्री म्हणाली की, ‘कपडे निवडणे ही तिची वैयक्तिक निवड आहे. कोणतेही कपडे कपडे असतात आणि ते दाखवण्याचा मुद्दा मला समजत नाही. कृपया हे करू नका’.
हेही वाचा –अभिनेता आमिर खानला करायचा आहे महाभारतावर चित्रपट, पण ‘या’ एका गोष्टीची वाटते भिती
गाण्याला आवाज भोजपुरी स्टारचा, पण मैफील लुटली मनीषाच्या ठुमक्यांनी; पाहून तुम्हीही लागाल नाचू