गाण्याला आवाज भोजपुरी स्टारचा, पण मैफील लुटली मनीषाच्या ठुमक्यांनी; पाहून तुम्हीही लागाल नाचू

भोजपुरी इंडस्ट्रीत गाजणाऱ्या नावांपैकी एक म्हणजे खेसारी लाल यादव होय. खेसारी हा भोजपुरी अभिनेता आणि गायक आहे. त्याचे सिनेमे आणि गाणी चाहत्यांना अक्षरश: वेड लावत असतात. त्याचे नाव ऐकताच चाहते त्याच्या गाण्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर सर्च करू लागतात. खेसारी त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच नवनवीन गाणी घेऊन येत असतो. अशात त्याचे आणखी एक गाणे चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. या गाण्यामध्ये त्याच्यासोबत एक अभिनेत्रीही दिसत आहे.

खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) याने भोजपुरी सिनेजगताला घराघरात पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. खेसारीची एक झलक पाहण्यासाठी मुली रांगच लावत असतात. अशात खेसारीच्या व्हायरल होत असलेल्या गाण्यांमध्ये त्याच्यासोबत एक अभिनेत्री दिसत आहे. ती अभिनेत्री म्हणजेच मनीषा मिश्रा (Manisha Mishra) होय. मनीषा भोजपुरी जगतातील प्रसिद्ध अदाकारा आहे. ती खेसारीसोबत या अल्बममध्ये ठुमके लावत आहे.

खेसारी आणि मनीषाच्या व्हायरल होत असलेल्या गाण्याचे नाव ‘हदे कैनी राजा जी’ (Hade Kaini Raja Ji) असे आहे. या गाण्यामध्ये मनीषाच्या अदा पाहण्यासारख्या आहेत. ती तिच्या बोल्ड अंदाजाने सर्वांनाच आपल्या इशाऱ्यांवर नाचवताना दिसत आहे. खेसारीसुद्धा तिच्या इशाऱ्यांवर नाचत आहे. खेसारी आणि मनीषाची केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली आहे. या गाण्याला युट्यूबवर तुफान प्रतिसाद मिळत आहे.

खरं तर, ३ महिन्यांपूर्वी स्पीड रेकॉर्ड्स भोजपुरी या युट्यूब चॅनेलवर हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. या गाण्याला ३३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, १ लाखांहून अधिक लाईक्स आणि ४ हजारांहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.

‘हदे कैनी राजा जी’ हे गाणे खेसारी लाल यादव आणि निशा सिंग यांनी गायले आहे. निशाच्या सुरेल आवाजावर मनीषा जोरदार ठुमके लावत आहे. खेसारीच्या या गाण्याचे बोल अखिलेश कश्यप आणि मनु साहू यांनी लिहिले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
वडील आमिर खानच्या खांद्यावरचं ओझं लेक आयरानं केलं कमी, सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉयफ्रेंडलाही घेतलं सोबत
‘जितका त्याचा टॅक्स, तेवढा तर माझा पगारही नाही’, अक्षयसोबतच्या तुलनेवर प्रसिद्ध अभिनेत्रीचे भाष्य
ओळखलं का मंडळी? फोटोमध्ये दिसणाऱ्या गोड मुलीला, सोज्वळ सौंदर्याने मराठी सिनेसृष्टीला लावले आहे वेड

Latest Post