वडील आमिर खानच्या खांद्यावरचं ओझं लेक आयरानं केलं कमी, सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉयफ्रेंडलाही घेतलं सोबत

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान हा सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याचा आगामी सिनेमा ‘लाल सिंग चड्ढा‘ होय. या सिनेमामुळे आमिरला चांगल्या- वाईट प्रतिक्रियांचा सामना करावा लागतोय. असे असले, तरीही आमिर त्याच्या सिनेमाचे प्रमोशन जोरात करतोय. आता त्याच्यासोबतच या सिनेमाच्या प्रमोशनची जबाबदारी त्याची मुलगी आयरा खान हिनेही आपल्या खांद्यावर घेतली आहे. आयराने खास अंदाजात या सिनेमाचे प्रमोशन केले आहे.

आमिर खान (Aamir Khan) याचे काम सोपे करण्याचे मुलगी आयरा खान (Ira Khan) हिने ठरवले आहे. आयरा ही सिनेमात काम करत नसली, तरीही तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ती सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असते. आयराला इंस्टाग्रामवर ६ लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. अशात तीदेखील तिच्या वडिलांच्या ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या सिनेमाचे प्रमोशन करताना दिसत आहे. आयराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आयरासोबत तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे (Nupur Shikhare) याच्यासोबत पोझ देताना दिसत आहे. या फोटोत आयरा आणि नुपूर या दोघांनीही काळ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले आहे.

या फोटोत आयरा आणि नुपूर यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य त्यांच्यातील केमिस्ट्री स्पष्ट करत आहे. यामध्ये आयराने नुपूरला एका बाजूने मिठी मारली आहे. दुसरीकडे, हा फोटो शेअर करत आयराने शानदार कॅप्शनही दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये “हाय” असे लिहिले आहे. यासोबतच तिने डोळा मारणाऱ्या इमोजीचा वापर करत ‘लाल सिंग चड्ढा’ हे हॅशटॅगही वापरले आहे. यावरून समजते की, आयरा तिच्या वडिलांच्या सिनेमाचे प्रमोशन करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

कधी प्रदर्शित होणार ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमा?
आमिर खान याचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा येत्या ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा रक्षाबंधनच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात आमिरशिवाय करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्य हेदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
‘जितका त्याचा टॅक्स, तेवढा तर माझा पगारही नाही’, अक्षयसोबतच्या तुलनेवर प्रसिद्ध अभिनेत्रीचे भाष्य
ओळखलं का मंडळी? फोटोमध्ये दिसणाऱ्या गोड मुलीला, सोज्वळ सौंदर्याने मराठी सिनेसृष्टीला लावले आहे वेड
‘माझी सेक्स लाईफ खूप…’ करण जोहरच्या शोमध्ये न जाण्याचे तापसी पन्नूने सांगितले विचित्र कारण