रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे


आलिया भट्ट ही बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी आलिया आपल्या क्युटनेसने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असते. जेव्हापासून तिने फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले आहे, तेव्हापासून तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अभिनेत्रीने प्रत्येक भूमिकेत स्वत:ला उत्तम प्रकारे मिसळले आहे. मात्र अलीकडे तिच्या वागण्यामुळे अभिनेत्री ट्रोल होत आहे. तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती पॅपराजीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

व्हायरल होतोय आलिया भट्टचा व्हिडिओ
आलिया भट्टचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती रंगीबेरंगी हुडी घालून कारमधून बाहेर पडते आणि लिफ्टच्या दिशेने जाते. यादरम्यान अभिनेत्रीचा ऍटिट्यूड पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ पाहणाऱ्या युजर्सने अभिनेत्रीला बरेच खरे-खोटे सुनावले आणि तिला ट्रोलही केले. (alia bhatt trolled for her actions video gone viral)

पुढच्या वर्षी करणार आहे लग्न
गेल्या काही दिवसांपासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. रणबीर आणि आलिया डिसेंबर २०२१ मध्ये लग्नबंधनात अडकतील असा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला होता. पण आता पुढच्या वर्षी एप्रिल किंवा मेपर्यंत दोघेही लग्नाच्या बेडीत अडकतील, अशा बातम्या येत आहेत.

हॉलिवूडमध्ये करणार पदार्पण
अलीकडेच अशीही बातमी आली होती की, आलिया भट्टने हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, आलिया भट्टने अमेरिकन एजन्सी विल्यम मॉरिस एंडेव्हरशी करार केला आहे. हॉलिवूडचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिनेत्री सज्ज झाली आहे. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आलिया हॉलिवूड स्टुडिओशी बोलणी करत आहे आणि लवकरच करारावर स्वाक्षरी करू शकते. हॉलिवूड प्रकल्पाची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर आगामी काळात अभिनेत्री ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’मध्ये दिसणार आहे. दोन्ही चित्रपट जानेवारी २०२२ मध्ये रिलीझ होणार आहेत. याशिवाय तिचा रणबीरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ आणि रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेमकथा’ हे चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती

-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

-‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता


Latest Post

error: Content is protected !!