KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती


‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय क्विझ रियॅलिटी शोमध्ये आजकाल लहान मुले आणि तरुण स्पर्धकांचा समावेश केला जात आहे. अशामद्ये प्रसारित झालेल्या शोच्या एका एपिसोडमध्ये, आराधी गुप्ता नावाच्या स्पर्धकाने उघड केले की, तिला मोठी झाल्यावर टेलिव्हिजन पत्रकार व्हायचे आहे. इतकंच नाही तर यादरम्यान तिने अमिताभ बच्चन यांची मुलाखत घेण्याची परवानगीही मागितली.

यावर, स्पर्धकाची इच्छा पूर्ण करत अभिनेत्याने तिला त्यासाठी परवानगीही दिली. आणि मग काय! आराध्याने बिग बींसाठी तिच्या प्रश्नांची पेटीच उघडली. यादरम्यान तिने अभिनेत्याला त्यांचे वाढते वय, काम आणि त्यांची नात आराध्या बच्चन यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्याचबरोबर बिग बींनीही एकामागून एक सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. (kbc 13 contestant asked big b a question about jaya bachchan amitabh bachchan asks to leave the show)

यादरम्यान आराधीने एक मजेदार प्रश्न विचारला. तिने विचारले, “तुमचा आवाज अलेक्सासाठी रेकॉर्ड झाला आहे. मग तुमच्या घरी जया आंटी जेव्हा ‘अलेक्सा एसी चालू करा’ म्हणते, तेव्हा अलेक्सा प्रतिसाद देते की तुम्ही ‘हो, मॅडम’ म्हणता?” आराधीचा हा प्रश्न ऐकून बिग बी थक्क झाले.

लगेच बिग बी म्हणाले, “श्री टीव्ही पत्रकार, मला आणखी मुलाखत घ्यायची नाही. यावेळी तुम्ही माझ्या घरातून निघून जा. यार, तुम्ही कमालीचे प्रश्न विचारता आहात.” त्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, “सर्व प्रथम, अलेक्सा घरी एसीशी कनेक्ट केलेले नाही. आम्ही ते मॅन्युअली वापरतो त्यामुळे घरी असे काही घडण्याची शक्यता नाही.”

यादरम्यान अमिताभ यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, त्यांच्या उंचीमुळे ते स्वतः घरातील पंखे साफ करतात का? यावर हसत अमिताभ यांनी उत्तर दिले की, “मी असे काही करत नाही.” विशेष म्हणजे, हा आठवडा लहान मुलांना समर्पित आहे. त्याच वेळी, या आठवड्यात ‘बंटी और बबली २’चे शुक्रवारच्या खास एपिसोडमध्ये विशेष पाहुणे म्हणून सामील होतील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एवढं महाग! राजकुमारने लग्नात पत्रलेखाला घातले तब्बल ‘इतक्या’ लाखांचे मंगळसूत्र, सर्वत्र रंगलीय चर्चा

-…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत

-श्वास रोखून धरा! करणच्या पहिल्या ऍक्शन चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार सिद्धार्थ, पाहा फर्स्ट लूक


Latest Post

error: Content is protected !!