‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता


नुकताच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाला देशभरात पसंती मिळत आहे. मात्र देशभरातून पसंती मिळत असतानाच पाकिस्तानात मात्र या देशाला तिरस्कार सहन करावा लागत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरिफ अल्वीपासून अभिनेत्री मेहविश हयातपर्यंत, चित्रपट इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देईल अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच, ५ नोव्हेंबरला रिलीझ झालेल्या या चित्रपटाने १०० कोटींच्या यादीत प्रवेश केला आहे. त्याचवेळी, चित्रपटात खलनायकाचे नाव मुस्लिम का ठेवण्यात आले आहे, असा प्रश्नही पाकिस्तानी जनतेला पडला आहे. मात्र, चित्रपटाचा निर्माता रोहित शेट्टीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (controversy pakistan upset with akshay kumars film sooryavanshi president arif alvi said the film will promote islamophobia)

या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त कॅटरिना कैफ, अजय देवगण आणि रणवीर सिंग देखील दिसले आहेत. तर चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीचे नाव मुस्लिम आहे. अशा स्थितीत खलनायकाचे नाव मुस्लिम असण्यावर काहींनी आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला.

याबाबत चित्रपटाचा निर्माता रोहित शेट्टीला यापूर्वी विचारण्यात आले होते. त्यावर तो म्हणाला होता की, “माझ्या चित्रपटातील खलनायक जर हिंदू असता, तर तेव्हा देखील हे प्रश्न उपस्थित केले गेले असते का? पाकिस्तानातून एखादा दहशतवादी आपल्या देशात आला तर त्याला आपण काय नाव देऊ, त्याचा धर्म काय? आपले पोलीस अधिकारी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांना पकडतात यावरही चित्रपटाची कथा आधारित आहे.”

तर दुसरीकडे, हा चित्रपट पाहिल्यानंतर पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी सोशल मीडियावर आक्षेप घेत म्हटले की, “अशा इस्लामोफोबिक कंटेंटमुळे भारताचाच नाश होईल. मला आशा आहे की, भारतातील समजदार लोक अशा गोष्टी थांबवतील.” यासोबतच ऑस्करसाठी नामांकित ब्रिटिश वंशाचे पाकिस्तानी कलाकार रिझ अहमद यांनीही सोशल मीडियावर कमेंट करताना आक्षेपार्ह इमोजीचा वापर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एवढं महाग! राजकुमारने लग्नात पत्रलेखाला घातले तब्बल ‘इतक्या’ लाखांचे मंगळसूत्र, सर्वत्र रंगलीय चर्चा

-…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत

-श्वास रोखून धरा! करणच्या पहिल्या ऍक्शन चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार सिद्धार्थ, पाहा फर्स्ट लूक


Latest Post

error: Content is protected !!