‘मला माहितीये लोक माझ्या वडिलांचा तिरस्कार करतात…’; #meetoo बाबत आलिया कश्यपने केले तिचे मत व्यक्त


बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याची मुलगी आलिया कश्यप ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो, व्हिडिओ किंवा तिचे एखादे वक्तव्य यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. अनेक मुद्यांवर ती तिचे मत व्यक्त करत असते. मग ते तिचे लव्ह लाईफ का असेना, ती बिनधास्त तिची मतं मांडताना दिसली आहे. नुकतेच तिने तिच्या वडिलांवर लावलेल्या #meetoo या आरोपावर तिचे मत सांगितले आहे.

तिने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा २०२० रोजी तिच्या वडिलांवर #meetoo चा आरोप लावला होता, तेव्हा ती खूप टेन्शनमध्ये होती. तिचे असे म्हणणे होते की, जे लोक तिच्या वडिलांना ओळखतात, त्यांना ते एका सॉफ्ट टेडीबिअर प्रमाणे वाटतात. पण जे लोक नाही ओळखत, त्यांना ते वाईट व्यक्ती म्हणतात. तिच्या वडिलांविरोधात लैंगिक शोषणाचा दावा केल्यावर ती खूप उदास झाली होती. तिचे असे म्हणणे होते की, हे सगळं खूप चुकीच्या पद्धतीने समोर आणले आहे.

आलियाने सांगितले की, या सगळ्याचा तिला राग येत नाही, तर तिला काळजी वाटते. ती म्हणाली की, “या आरोपानंतर मला खरंच खूप काळजी वाटत होती. मला माहित आहे की, या कारणासाठी मला पप्पांप्रती लोकांचा राग सहन करावा लागला आहे. आलियाचे असे म्हणणे आहे की, जे लोक अशा पद्धतीने बोलतात त्यांच्या आयुष्यात काही चांगल करण्यासारखे नाहीये. परंतु माझ्या वडिलांनी मला या सगळ्यापासून दूर ठेवलं आहे. कारण त्यांना माझी काळजी आहे.” (Aliyah Kashyap reaction on #meetoo about her father Anurag Kashyap)

काही दिवसांपूर्वी पायल घोष नावाच्या एका महिलेने अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला होता. याविरुद्ध तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली होती. याबाबत त्याची चौकशी केली गेली आहे. अनुराग कश्यपला याबाबत सोशल मीडियावर खूप ट्रोल केले होते.

आलिया कश्यप ही चित्रपटामुळे नाही तर यूट्यूबवरील तिच्या व्हिडिओंमुळे खूप चर्चेत असते. नुकतेच तिची तिच्या वडिलांसोबत झालेली एक मुलाखत यूट्यूबवर जोरदार व्हायरल झाली होती. यात तिने तिच्या वडिलांना अनेक प्रश्न विचारले होते. अनुरागने देखील खुल्या मनाने उत्तरं दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हिंदी चित्रपटसृष्टीला लाभलेले महान गायक मुकेश; त्यांच्यासाठी राज कपूरांनी म्हटले होते, ‘जर मी शरीर आहे, तर मुकेश…’

-जेव्हा दीपिका पदुकोणला वाटायचं, ‘आयुष्य नाही महत्त्वाचं’, डिप्रेशनच्या दिवसाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.