Latest Posts

जेव्हा दीपिका पदुकोणला वाटायचं, ‘आयुष्य नाही महत्त्वाचं’, डिप्रेशनच्या दिवसाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा


दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या व्यवसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. मग ते तिच्या लग्नाआधीचे आयुष्य असो किंवा लग्नानंतरचे आयुष्य असो. दीपिका अनेकवेळा तिच्या आयुष्यात वाईट आठवणींचा खुलासा करत असते. जेव्हा ती खूप काळ डिप्रेशनमध्ये होती, तेव्हा ती पूर्णपणे तुटून गेली होती. तिच्या सगळ्या चाहत्यांना याबाबत माहिती आहे की, ती अनेक दिवस डिप्रेशनमध्ये होती. तिने याबाबत अनेकवेळा भाष्य केले आहे. एवढंच नाही, तर ती अनेकवेळा मानसिक संतुलनाबाबत देखील बोलली आहे.

नुकतेच अभिनेत्रीने क्लब हाऊस सेशनमध्ये डिप्रेशनबाबत वक्तव्य केले आहे. तिने सांगितले की, “ही 2014 च्या सुरुवातीच्या दिवसांची गोष्ट आहे, जेव्हा मी पूर्ण दिशाहीन झाले होते. मला असं वाटतं होतं की, आयुष्य काहीच महत्वाचं नाहीये. याचा काहीच उपयोग नाहीये. मला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या काहीच जाणीव होत नव्हती. मला अगदी शून्यात असल्यासारखे वाटत होते. खूप महिने हे असंच चालले होते. एकदा माझ्या कुटुंबातील सगळे माझ्या घरी आले होते. जेव्हा ते घरी जाण्यासाठी पॅकिंग करत होते, तेव्हा मी खोलीत बसून रडायला लागले होते. माझ्या आईला जाणवले की, काहीतरी झाले आहे. मी वेगळीच रडत होते. बॉयफ्रेंड किंवा कामामुळे रडतात तसं तर ते नक्कीच नव्हतं.” (Deepika Padukone open ups about her depression said just felt life has no meaning)

तिने पुढे सांगितले की, “माझे रडणे पाहून माझी आई अंदाज लावत होती की, नक्की काय झालं असेल. पण मी कारण सांगत नव्हते. ती मला म्हणाली की, मला साफ दिसत आहे की, डिप्रेशनच्या आधी तू कशी होतीस आणि आता कसा बदल झाला आहे. डिप्रेशनच्या आधी मी खूप चांगले आयुष्य जगत होते. त्यानंतर मला खूप मेहनत करावी लागली होती, जेणेकरून मी मागे परत जाऊ नये.”

दीपिका पदुकोण ही सध्या बॉलिवूडमधील एक टॉपची अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटात तिच्यासोबत किंग खान म्हणजेच शाहरुख खान होता. तिने आणि तिचा पती रणवीर सिंगने बऱ्याच चित्रपटात एकत्र केले आहे. त्यांनी ‘पद्मावत’, ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले. तसेच ते त्यांच्या ’83’ या आगामी चित्रपटात देखील एकत्र काम करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका! साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स

-‘सैंया झूठों का बड़ा सरताज निकला’ गाण्यावर थिरकली ऋचा चड्ढा; पब्लिक डिमांडवर शेअर केला व्हिडिओ

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss