मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेले आहे. त्यांनी माहेरची साडी, बाळाचे बाप ब्रम्हचारी, आई तुझा आशिर्वाद यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत. त्यांची प्रत्येक साध्या आणि सरळ भूमिका महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली होती. नुकतीच अलका कुबल यांनी माध्यमांना मुलाखत दिली. आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी आज वरचचे अनेक खुलासे केले आहेत. या मुलाखतीत त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये काम का केले केले नाह? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
यावर उत्तर देताना अलका कुबल म्हणाला की, “मी असं म्हणणार नाही पण आपल्याही मराठी अभिनेत्रीने बॉलीवूड गाजवला आहे. अगदी आपल्यासारख्या मराठी इंडस्ट्रीतून त्या आल्या नाही. पण माधुरी दीक्षित सोनाली बेंद्रे या अभिनेत्रींनी हिंदी सिनेमा सृष्टीत स्वतःच साम्राज्य निर्माण केले आहे. मुळात त्यांनी सुरुवातच हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून केली.”
यापुढे अलका कुबल म्हणाल्या की, ,मला ज्या हिंदी चित्रपटांसाठी ऑफर आल्या त्या फार काही मोठ्या नव्हत्या. कधी वहिनीचा रोल तर कधी तिथे चार सीन दोन सिन द्यायचे अशा ऑफर सुद्धा आल्या होत्या. म्हणून मला असं वाटलं की , आपण तिथे जाऊन काम करण्यापेक्षा हिंदीत काम करायचं नाही. हिंदी चित्रपट म्हणजे एवढं काय आहे. मी हिंदी चित्रपट का करावेत मग जर मी हिंदी सिनेमा केले, तर निदान योग्य भूमिका तरी मिळाली पाहिजे. तसं बॅनर तरी पाहिजे ज्याने माझं करिअर घडेल”.
पुढे त्या म्हणाल्या की, “मी इथे मराठीत साम्राज्ञी सारखी होते. ते सोडून नको ते करायला जायचं आणि माझ्या मराठी ऑडीअन्सच्या मनातून निघून जायचं. त्यामुळे मी हिंदी चित्रपटमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. नुसतं पैशासाठी आणि पर दे चांगला मिळतोय म्हणून मी काम करायचं त्यापेक्षा मी मराठीत काम केले. त्याची मला कधी त्याची खंत वाटली नाही.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
कॅन्सरच्या उपचारादरम्यान पडद्यावर परतली हिना खान, ‘गृहलक्ष्मी’ बनून जिंकणार चाहत्यांची मने
मीरा बनली हेमा; ‘इलू इलू’ चित्रपटात दिसणार हटके अंदाजात