प्रत्येक कलाकारांना प्रसिद्ध होण्यासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम माध्याम झाले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम सारखे अँप्स लोक मोठ्या प्रमाणात वापरतात. कलाकारांसाठी तर सोशल मीडिया म्हणजे त्यांचं हक्काचं व्यासपीठ बनले आहे. कलाकारांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते आधी त्यांचा सोशल मीडियावर सतत नजर ठेवून असतात. कलाकार नवी प्रोजेक्टमध्ये काम करणार असले तरी ते सोशल मीडियाच्या माध्यामातून सांगत असतात. सध्या अभिनेत्री रिंकू राजगुरूने सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलिट केल्या आहेत.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू (Rinku Rajguru Instagram) होय. रिेंकू सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. पण सध्या रिंकू विषयी एक वाईट बातमी समोर आली आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्ट्स डिलीट केल्या आहेत.
रिंकूच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट्स डिलीट केल्या आहेत. रिंकूच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आता फक्त दोन पोस्ट्स दिसतात. एक पोस्ट रक्षाबंधनाच्या दिवशी 30 ऑगस्टला केलेली आहे. या पोस्टमध्ये रिंकूने आपल्या भावाबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. दुसरी पोस्ट 26 जून 2023 ची आहे. या पोस्टमध्ये तिने एक रील व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
रिंकूच्या या पोस्ट्स डिलीट का झाल्या याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही चाहत्यांनी अंदाज लावला आहे की, रिंकू राजगुरू सोशल मीडियावरून एक ब्रेक घेत आहे. तर काही चाहत्यांनी असेही म्हटले आहे की, तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले असेल. रिंकूच्या या निर्णयामुळे तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. रिंकूला सोशल मीडियावर 773k लोक फॉलो करतात. तर रिंकू केवळ 25 जणांना फॉलो करते. पण या प्रकरणी रिंकूने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अधिक वाचा-
–एकदम झक्कास! अक्षया देवधरच्या घरीही झाले गणपती बाप्पाचे आगमन
–किरण मानेंना ‘जवान’ची भुरळ; ‘चलेया’ गाण्यावरील जबरदस्त डान्सचा व्हिडीओ व्हायरल; चाहते म्हणाले…