Sunday, April 14, 2024

किरण मानेंना ‘जवान’ची भुरळ; ‘चलेया’ गाण्यावरील जबरदस्त डान्सचा व्हिडीओ व्हायरल; चाहते म्हणाले…

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाका करत आहे. किंग खानच्या या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड पसंती मिळत आहे. अनेक कलाकारांनीही या चित्रपटावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यात अभिनेते किरण माने यांचाही समावेश आहे. अभिनेते किरण माने सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. ते त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या किरण माने यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

किरण माने (Kiran Mane Video) हे शाहरुख खानचे चाहते आहेत. ‘जवान’ प्रदर्शित झाल्यापासून ते या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. नुकताच त्यांनी ‘जवान’ चित्रपटातील ‘चलेया’ या गाण्यावरचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या व्हिडिओमध्ये, किरण माने ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतील चिंधी म्हणजे बालकलाकार अनन्या टेकवडे बरोबर ‘चलेया’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. किरण माने यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे की, “लाडक्या लेकीचा हट्ट पुरवावा लागला. मला नाचता येत नसतानाबी नाचायला लागलं.”मस्त डान्स दादा.” तर दुसऱ्या एकाने लिहिले की, “जाळ आन धुर संगटच.”

किरण मानेंच्या या व्हिडिओला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी त्यांना ‘जवान’ चित्रपटाबद्दल कौतुक केले आहे. तर काही जणांनी त्यांना त्यांच्या डान्सचे कौतुक केले आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “जाळ आन धुर संगटच.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

दरम्यान, किरण मानेंची ‘सिंधुताई माझी माई’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतही त्यांनी वडिलांची भूमिका साकारली आहे. यापूर्वी त्यांनी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’मध्ये वडिलांची भूमिका साकारली होती. जी चांगलीच गाजली होती. (Watch the video of Kiran Mane amazing dance performance on Chaleya song from Shahrukh Khan movie Jawan)

अधिक वाचा-
शाहरुख खानसोबत ‘जवान’मध्ये काम करताना दीपिका पदुकोणने केला ‘या’ गोष्टीचा त्याग; म्हणाली…
एकदम झक्कास! अक्षया देवधरच्या घरीही झाले गणपती बाप्पाचे आगमन

हे देखील वाचा