Monday, July 8, 2024

वडील होते भारतीय सैन्य दलात, तर बहीण आहे गृहिणी, जाणून घ्या अक्षयच्या कुटुंबातील मंडळींविषयी

अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे बुधवारी (०८ सप्टेंबर) निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमधून अक्षयचे सांत्वन केले जात आहे. अरुणा भाटिया या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांचे गुडघे फार फार दुखायचे. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांनी वयाच्या सत्तरीमध्ये या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्च्यात त्यांचा मुलगा अक्षय कुमार, मुलगी अलका भाटिया, सून ट्विंकल खन्ना आणि दोन नातवंड आहेत. जाणून घेऊयात अक्षयच्या पूर्ण परिवाराविषयी.

अक्षयच्या वडिलांचे नाव हरिओम भाटिया होते. साल २०००मध्ये त्यांचे कर्करोगाने निधन झाले. ते भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. वडिलांच्या निधनानंतर अक्षयने त्यांच्या नावाने एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले. त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाने गरीबांसाठी हरिओम कर्करोग आश्रयस्थानही बांधले. ज्यामध्ये कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. तसेच त्याची आई अरुणा भाटिया एक चित्रपट निर्मात्या होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ‘हॉलीडे’, ‘नाम शबाना’ आणि ‘रुस्तम’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

त्यांच्या निधनानंतर अक्षयने भावुक होत एक ट्वीट केले होते. त्यामध्ये त्याने असे लिहिले होते की, “ती माझ्या खूप जवळ होती. आज ती आमच्यात नसण्याचे मला खूप दु:ख होत आहे. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला व दुसऱ्या जगात माझ्या वडिलांना भेटायला गेल्या. तुम्ही या काळात मला व माझ्या परिवाराला जो पाठिंबा दिला, त्यासाठी तुमच्या सर्वांचे आभार. ओम शांती.”

अक्षयने ट्विंकल खन्नाबरोबर १७ जानेवारी, २०१७ मध्ये विवाह केला होता. त्याची पत्नी लग्नाआधी चित्रपटांमध्ये काम करायची. परंतु लग्नानंतर तिने घराची देखभाल करणे पसंत केले. ती सोशल मीडियावर देखील जास्त झळकत नाही. परंतु ती एक लेखिका आहे. ती वृत्तपत्र आणि व्यंगात्मक लेखांसह पुस्तके देखील लिहिते. तिचे साहित्य वाचक आणि तिचे चाहते आवडीने वाचतात. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाला बॉलिवूडमधील बेस्ट जोडपं मानले जाते. (All you need to know about akshay kumar and his family)

अक्षयला दोन मुलं आहेत. त्याच्या मुलाचे नाव आरव आणि मुलीचे नाव नितारा आहे. आरवचा जन्म १५ सप्टेंबर, २००२मध्ये झाला होता. त्याने आपले शालेय शिक्षण मुंबईमध्येच पूर्ण केले. त्यानंतर आपलं उच्चमाध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो सिंगापूरमध्ये आहे. त्याला कराटेची देखील चांगलीच आवड आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये आरवच्या शिक्षणाविषयी अक्षयला विचारण्यात आले होते, तेव्हा तो म्हणाल होता की, “सध्या तो आपलं आयुष्य एन्जॉय करत आहे. त्यामुळे आता त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव आणणे बरोबर नाही. एखादं बाळ तेव्हाच दडपणामध्ये असतं, जेव्हा त्याचे आई- वडील त्याला दडपणामध्ये ठेवतात. मला असे वडील नाही बनायचे.”

अक्षयची मुलगी अजून लहान आहे. ती शाळेत जाते. अक्षय जेव्हा घरी असतो, तेव्हा तो त्याच्या मुलांबरोबर खूप मस्ती करतो. अक्षयने त्याच्या मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवलेले आहे. कधीतरी तो आपल्या मुलांबरोबरचे एक दोन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतो.

अक्षयची बहीण अलका चित्रपटांच्या रोषणाईपासून दूर आहे. परंतु आपल्या भावाच्या प्रत्येक सुख- दुःखात सहभागी असते. ती एक गृहिणी असून तिचे पती सुरेंद्र तिच्या पेक्षा १५ वर्षांनी मोठे आहेत. सुरेंद्र ‘हाउस ऑफ हीरानंदानी’चे फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ‘हाउस ऑफ हीरानंदानी’ एक मोठा बिजनेस ग्रूप आहे. इथे भारतातील रिअल इस्टेट आणि हाउसिंग सेक्टरचे काम पहिले जाते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

-तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

हे देखील वाचा