दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन नुकताच कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. तसेच तो घरातच क्वारंटाईन असल्याचेही त्याने सांगितले होते. एकीकडे चाहते अल्लू लवकर बरा होण्याची प्रार्थना करत आहेत, तर दुसरीकडे, त्याची मुलगी वडिलांची खास काळजी घेत आहे. अल्लू अर्जुनच्या मुलीने त्याच्यासाठी खास डोसा बनविला आहे, ज्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत अल्लू अर्जुनने सांगितले की, त्याची मुलगी त्याच्यासाठी खास डोसा बनवित आहे. खरं तर, त्याने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यात आपण डोसा बनताना पाहू शकतो. इतकेच नाही, तर डोसा कसा बनला आहे, हेदेखील त्याने एक फोटो शेअर करत दाखवले आहे. ‘हा डोसा कधीच विसरता न येणारा आहे,’ असे अभिनेता म्हणाला आहे.
अल्लूने एका आठवड्यापूर्वी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. त्याने पोस्ट शेअर करत चाहत्यांना सांगितले होते की, चिंता करण्याची गरज नाही, तो बरा आहे. त्याने लिहिले होते, “सर्वांना नमस्कार, मी कोरोना पॉझिटिव्ह झालो आहे. मी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची चाचणी करुन घ्या, अशी मी विनंती करतो. मी माझ्या सर्व हितचिंतकांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, काळजी करू नका, मी ठीक होत आहे. घरी राहा सुरक्षित राहा.”
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अल्लूच्या ‘पुष्पा’ या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा तेलुगु चित्रपट तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अल्लूचा पहिला पॅन इंडिया चित्रपट असेल. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन चित्रपट निर्माते सुकमारसोबत तिसऱ्यांदा काम करत आहे. तसेच, चित्रपटात अल्लूसमवेत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १३ ऑगस्टला रिलीझ होणार आहे.
‘पुष्पा’ या चित्रपटाची कथा एका विशेष कथेवर आधारित असणार आहे. अल्लू अर्जुन आंध्रच्या डोंगरावर लाल चंदनची तस्करी करताना आणि त्यासाठी पोलिसांशी लढा देताना दिसणार आहे. यासाठी प्रेक्षक खूप उत्साही आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सर्वांसमोर अचानक कॅटरिना कैफचा ड्रेस खिसकताच ‘भाईजान’ने केलं असं काही; पाहा व्हिडिओ
-सोनू सूदच्या घराबाहेर मदतीसाठी लोकांची गर्दी, कौतुक करत चाहतेे म्हणाले ‘तो हनुमान आहे’