Monday, April 15, 2024

‘जय अल्लू अर्जुन..’ म्हणत, अभिनेत्याच्या चाहत्यांनी केली प्रभासच्या चाहत्याला बेदम मारहाण, पाहा व्हिडिओ

पुष्पा फेम अल्लू अर्जुनचे (Allu Arjun) संपूर्ण देशात चाहते पसरलेले आहेत. अनेकवेळा आपण त्याच्या चाहत्यांना त्याच्यासाठी काहीतरी नवीन करता पाहिले आहे. परंतु आता त्याच्या चाहत्यांनी असे काही केले आहे. जे वाचून तुम्हालाच धक्का बसेल. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी बेंगळुरूमध्ये एका व्यक्तीला मारहाण केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा बेंगळुरू शहर पोलिसांच्या अधिकृत X खात्याला या घटनेबद्दल अलर्ट करण्यात आले तेव्हा पोलिसांनी कारवाई केली. इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक गट दुसऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर आहे.

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी केली मारहाण
त्यापैकी एकाला मारहाण होत असलेल्या व्यक्तीला ‘जय अल्लू अर्जुन’ म्हणण्यास सांगताना दिसत आहे. परंतु त्या जमिनीवर ओढल्यानंतरही रक्ताने माखलेले दिसून येते. केआर पुरमजवळ ही हे भांडण झालेली आहेत. याबाबत अजूनही कोणती अधिकृत माहिती आलेली नसली तरी देखील X वरील काही चाहत्यांनी दावा केला आहे की मारहाण झालेली व्यक्ती प्रभासचा चाहता आहे.

सोशल मीडियावर युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या
एका यूजरने ट्विटरवर लिहिले की, “प्रभास आणि अल्लू अर्जुनचे चाहते मूर्ख आहेत. दुर्दैवाने अल्लू अर्जुनच्या 10 चाहत्यांनी बेंगळुरूमध्ये प्रभासच्या एका चाहत्यावर हल्ला केला. अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी आमची विनंती आहे. दुसऱ्या युजरने व्हिडिओ शेअर करत लिहिले, “अल्लू अर्जुनचे चाहते आणि प्रभासच्या चाहत्यांमध्ये भांडण सुरू आहे.”

अभिनेत्याने प्रतिसाद दिला नाही
“आम्ही @krpurambcpps ला आवश्यक कारवाईसाठी कळवले आहे,” अधिकाऱ्याने गैरवर्तन करणाऱ्याचे तपशील शेअर केले आहेत. अल्लू अर्जुनने अद्याप या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ नवीन टिझर प्रदर्शित
मुंबई मेट्रोमध्ये डान्स केल्याने नोरा फतेही ट्रोल: लोक म्हणाले, ‘स्वस्त नौटंकी…’

हे देखील वाचा